खेडभैरव : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील भाताचे सरासरी क्षेत्र हे २८ हजार हेक्टर इतके आहे. मात्र, यावर्षी यात अडिच हजार हेक्टरची वाढ होऊन ३० हजार ८०० हेक्टरवर भात लागवड झाली आहे. तर त्या तुलनेत नागली, खुरासणी, सोयाबीन या पिकांच्या लागवडीत मात्र मोठी घट झाली आहे. येत्या आठवडाभरात तालुक्यात संपूर्ण भाग लागवड पूर्ण होणार आहे. (Farmers in Igatpuri believe in rice Cultivation)