Onion Chawl Subsidy Off: कांदा चाळ अनुदान बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज

Nashik News : या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज झाला आहे. ते अनुदान पूर्ववत सुरू करावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
onion chawl farmer
onion chawl farmeresakal
Updated on

नांदूर शिंगोटे : शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यापूर्वी पणन महामंडळाकडून कांदा चाळीसाठी जे अनुदान दिले जात असे, ते बंद करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी नाराज झाला आहे. ते अनुदान पूर्ववत सुरू करावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. (Nashik Farmers in rural areas upset over decision to stop onion chawl subsidy marathi news)

सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कांदा कशाप्रकारे साठवणूक करून त्याची जी निगराणी राखली जाते त्यासाठीही अनुदान देऊन शेतकरी त्यामध्ये अजून पैसे टाकून कांदा चाळी उभारत असतो. मध्यंतरीच्या काळात 'मागेल त्याला कांदा चाळ' हा निर्णय लागू करण्यात आला व आता पुन्हा कांदा चाळ अनुदान बंद करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. तो पूर्णपणे चुकीचा असल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: नाराज झाला आहे.

हा जो निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना नक्कीच बसल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय घेऊन सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळल्यागत परिस्थिती निर्माण केली आहे. या अगोदर शेतकऱ्यांना शेतीमालाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली. (latest marathi news)

onion chawl farmer
Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

त्याचा अनुभव नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सरकार अनुभवत नाही तोच सरकार परत शेतकऱ्यांच्या दुखण्यावर मीठ चोळत आहे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारने जो काही काल निर्णय घेतला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. या निर्णयामुळे सरकारला आगामी निवडणुकीमध्ये शेतकरी वर्ग पुन्हा त्यांची जागा चांगल्या प्रकारे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

ग्रामीण भागामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणावर सरकारी विरोधी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यासाठी शेतकरी संघटनेचे भारत दिगोळे यांच्यासोबत राहून शेतकरी वर्ग तीव्र आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने आपल्या ज्या चुका होत आहेत, त्या त्वरित सुधारणे महत्त्वाचे आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावना जाणून सुद्धा चुकीचे वागत आहे. तेव्हा शेतकरी संघटनेच्या वतीने एकत्रित येऊन राज्य सरकारच्या विरोधी तीव्र आंदोलनाचा इशारा, भारत दिगोळे यांनी दिला आहे.

onion chawl farmer
Nashik Police : शहरातून दहा सराईत गुंडांची तडीपारी! आयुक्तांचा दणका; परिमंडळ दोनच्या उपायुक्तांची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.