नाशिक : राज्यात महायुती, महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीदेखील शेतकरी संघटनेची विधानसभेबाबतची आपली भूमिका मांडली. ‘शेतकरी आंदोलन, कर्जमुक्ती’ या झेंड्याखाली ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. (Farmers organizations also in Vidhansabha)
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्जवसुली बंद करावी व सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा खाते उतारा कोरा करावा, या मागणीसाठी शेतकरी समन्वय समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. कर्जवसुली करणे हे अनैतिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, तरीदेखील वसुली केली जात आहे. ते चुकीची आहे. शासनाची ही भूमिकाच बेकायदेशीर आहे. इतर जिल्ह्यात वसुली होत नसून, आम्ही तर कर्जमुक्त झालो असल्याचे, त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभा निवडणूक आम्ही एक आंदोलन म्हणून लढणार आहोत. हा पॅटर्न नाशिक जिल्ह्यातून संपूर्ण राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील साखर कारखाने पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे होते. त्यातील बहुतांश कारखाने आज भाजपाच्या लोकांकडे आहेत. त्यामुळे सर्वच जण सारखेच आहेत. (latest marathi news)
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासंदर्भात आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले, पांडुरंग रायते, वस्ताद दौंडकर, हनुमंतराव वीर, श्रीकांत गावंडे, भगवान बोराडे, कैलास बोरसे, धोंडिराम थैल, दागाजी अहिरे, भाईदास दादा पाटील आदी उपस्थित होते.
शेतकरी नेत्यांना टोला
आंदोलकांनी आंदोलनाला वर्षभरात विविध शेतकरी नेत्यांनी भेटी दिल्या. मात्र न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. हाच धागा पकडत पाटील यांनी तुमच्या आंदोलनाला आजवर ज्या-ज्या शेतकरी नेत्यांनी भेट दिल्या. त्यापैकी अनेक जण शेतकऱ्यांच्या आयुष्यात विष कालविण्याचेच काम करत असल्याचा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. शेतकरी नेता म्हणून ज्यांनी विविध पदे भूषविली, त्यांना आम्ही विधानसभेला बरोबर घेणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.