Nashik News : शेंद्रीपाडाच्या नशिबी अजूनही पायपिटच! अनेक मंत्री आले अन गेलेही...रस्ता मात्र जैसे थेच!

Latest Nashik News : आदिवासी जनतेला त्याच खाचकळग्तून अन चिखलातून वाट तुडवावी लागत आहे. अधिकारी येऊन गेले, मंत्री असेपर्यत तात्पुरते रस्ता करणार असे सांगितले मात्र नंतर तेही विसरून गेल्याने आज जनतेला हाल सासावे लागत आहे.
Since there is no road to reach Shendripada at present, the tribal people have to go through these cracks and mud and water.
Since there is no road to reach Shendripada at present, the tribal people have to go through these cracks and mud and water.esakal
Updated on

हरसूल : खरशेत ग्रामपंचायतीपैकी शेंद्रिपाडा हे आदिवासी लोकवस्तीचे गाव, ‘सकाळ’ने येथील समस्यांना वाचा फोडल्यानंतर दोन वर्षापासून अनेक मंत्री, अधिकारी येथे येऊन गेले मात्र आजतागायत रस्ता काही झालेला नाही. आदिवासी जनतेला त्याच खाचकळग्तून अन चिखलातून वाट तुडवावी लागत आहे. अधिकारी येऊन गेले, मंत्री असेपर्यत तात्पुरते रस्ता करणार असे सांगितले मात्र नंतर तेही विसरून गेल्याने आज जनतेला हाल सासावे लागत आहे. (Shendripada road in bad condition)

सुमारे अडीचशे ते तीनशे लोकवस्ती असलेल्या शेंद्रिपाड्याला माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे, मंत्री दादा भुसे यांनीही भेट देऊन गावाची पाहणी करत पूल, रस्ता निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या शेंद्रीपाडा गावाला अजूनही कुठल्याही प्रकारची गाडी जात नाही.

येथील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत डोली करून किंवा मोठ्या हालअपेष्टेने पायी-पायी चालत मुख्य रस्त्यावरून वाहनाने प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तू घेऊन त्या नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यावेळी दौऱ्यासाठी गावापर्यंत व नदीपर्यंत गाड्या जातील, यासाठी कच्चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करून उपलब्ध करून दिला होता. (latest marathi news)

Since there is no road to reach Shendripada at present, the tribal people have to go through these cracks and mud and water.
Beed Crime: अल्पवयीन मुलगी पोटात दुखतंय म्हणून रूग्णालयात गेली, साडेपाच महिन्यांची गर्भवती निघाली; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

मात्र मंत्री जाताच हा रस्ताही गायब झाला आहे. पक्का रस्ता करण्याची कुठलीही तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्याने शेंद्रिपाडा गाव अजूनही रस्त्यांपासून वंचितच आहे. लवकरात लवकर रस्त्याची निर्मिती व्हावी व शेंद्रीपाडेकरांची हेळसांड थांबवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

"शेंद्रीपाडा गावाला रस्ता व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारल्या, मात्र अधिकारींकडून फक्त आश्वासन मिळाले, अजून प्रत्यक्षात कुठल्याही निधीची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आलेली नाही. या गावाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता व पूल करावा."- विठ्ठल दळवी, सरपंच, खरशेत.

Since there is no road to reach Shendripada at present, the tribal people have to go through these cracks and mud and water.
African Swine Fever : ‘आफ्रिकन स्वाइन फिवर’च्या पार्श्वभूमीवर दक्षता; जळगाव जिल्ह्यात 9 हजारांहून अधिक वराहांचे लसीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.