Father's Day : गोंदेश्वराच्या प्रांगणात अनाथासोबत स्नेहमेळावा

Father's Day : अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या ठाणगाव येथील समर्थ सावली केंद्रातर्फे सिन्नरच्या गोंदेश्वराच्या प्रांगणात चिमुकल्याचा स्नेहमेळावा झाला.
Harshal Chin, Tejas Lakare, Gaurav Dumbre etc. from Samarth Sawli Nursery Center with the orphaned children in the courtyard of Gondeshwar.
Harshal Chin, Tejas Lakare, Gaurav Dumbre etc. from Samarth Sawli Nursery Center with the orphaned children in the courtyard of Gondeshwar.esakal
Updated on

Father's Day : रविवार सुट्टीचा दिवस त्यात फादर्स डे. अर्थात वडिलांचा दिवस प्रत्येक दिवस. पण ज्या चिमुकल्यांना आई किंवा वडील नाही अशा अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या ठाणगाव येथील समर्थ सावली केंद्रातर्फे सिन्नरच्या गोंदेश्वराच्या प्रांगणात चिमुकल्याचा स्नेहमेळावा झाला. फादर्स डेच्या निमित्ताने सावली केंद्रातर्फे जयराम शिंदे व केंद्रातील हर्षल चिने ,तेजस लकारे ,गौरव डुंबरे,साहिल रोहमारे,यश चिने आदी सहकाऱ्यांनी अनाथांचा फादर्स डे गोड व्हावा या हेतून चिमुकल्यांसाठी आमरस पुरणपोळी तसेच पर्यटन स्थळांना भेटीचा उपक्रम राबविला. ( Father Day get together with an orphan in courtyard of Gondeshwar marathi news)

सिन्नर शहरातील पंचवटी मोटल्स येथे आमरस व हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिर पर्यटन स्थळी भेटीतून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न झाला. रविवारी हर्षल चिने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांसोबत विविध स्थळी भेट देत आनंदाने साजरा करीत माणुसकीचे दर्शन घडविले. तसेच चिने व त्यांचे सहकारी तेजस लकारे ,गौरव डुंबरे,साहिल रोहमारे,यश चिने आदीनी दिवस घालविला. (latest marathi news)

Harshal Chin, Tejas Lakare, Gaurav Dumbre etc. from Samarth Sawli Nursery Center with the orphaned children in the courtyard of Gondeshwar.
Fathers Day 2024 : वृद्धाश्रमातील बाबाची कहानी!

''पाथरे येथील मित्र इंजीनियर हर्षल चिने यांनी समर्थ सावलीतील सर्व मुलांना त्यांच्या चारचाकीत गोंदेश्र्वर मंदिर येथे सहलीला नेले. सिन्नरच्या पंचवटी मोटेल्सला सर्व मुलांना आग्रहपूर्वक भोजन दिले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित करणाऱ्या हर्षलभाऊ यांनी माणुसकीचे दर्शन दिले.''- जयराम शिंदे (समर्थ सावली, ठाणगाव)

Harshal Chin, Tejas Lakare, Gaurav Dumbre etc. from Samarth Sawli Nursery Center with the orphaned children in the courtyard of Gondeshwar.
Father's Day: लेकीची मायाच वेगळी, मुलीने केले वडिलांना यकृत दान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.