येवला : प्रतिकूल परिस्थितीत लागवड करून जगवलेले कांदा पीक परतीच्या पावसाने धोक्यात आणले आहे. रोजच्या पावसामुळे वाफ्यात पाणी साचून कांदा पीक वाफ्यातच खराब होऊ लागले आहे. त्यामुळे ३० ते ५० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असल्याने विनाअट पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आठमाही शेती असल्याने तालुक्यात लाल कांद्यावरच शेतकऱ्यांचा भरोसा असतो. या वर्षी आठ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात लाल कांद्याची लागवड झाली आहे. ( Fear of halving production of creeping onions including red onions due to daily rains )