Nashik News : हिरकणी कक्षाची माया कोरडी! निफाड तालुक्यात बसस्थानकातील कक्ष कुलुपबंद

Nashik : सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांना तान्ह्या बाळासाठी स्तनपान करता यावे म्हणून हिरकणी कक्षाचा आधार मिळतो.
A locked feeding room in a bus station.
A locked feeding room in a bus stationesakal
Updated on

Nashik News : सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांना तान्ह्या बाळासाठी स्तनपान करता यावे म्हणून हिरकणी कक्षाचा आधार मिळतो. त्यासाठी परिवहन महामंडळाने स्तनदा प्रवासी महिलांसाठी प्रत्येक आगारात हिरकणी कक्ष निर्माण केला आहे. त्यासाठी विजेची सोय, खाट, टेबल, खुर्ची, बाथरूम, पाणी आदी सुविधा करण्यात आल्या. मात्र, निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतसह प्रवाशांनी गजबजलेल्या बसस्थानकात कुलुपबंद, तर कुठे दुरावस्था झालेली आढळते. (feeding room Locked at bus stand in Niphad taluka)

त्यामुळे माता व बालकांसाठी हिरकणी कक्षाची माया कोरडीच असल्याचे चित्र आहे. निफाड तालुक्यात ओझर, निफाड, पिंपळगाव बसवंत, लासलगाव ही बसस्थानके नेहमीच प्रवाशांनी हाऊसफुल्ल असतात. स्तनदा मातांच्या सोयीसाठी येथे हिरकणी कक्ष उभारण्यात आले. पण, नंतर त्यांचा वापर होत नसल्याने ते दुर्लक्षित झाले आहे. काही आगारांमध्ये हिरकणी कक्ष सज्ज आहेत.

तर कुठे अडगळीच्या खोलीसारखी अवस्था त्या कक्षांची झाली आहे. काही कक्ष कुलुपबंद असल्याने ते शो-पीस ठरत आहे. पिंपळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्ष तर गेल्या दोन वर्षापासून उघडलेलाच नाही. एकही महिला चावी मागण्यासाठी आली नसल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. (latest marathi news)

A locked feeding room in a bus station.
Nashik News : आरोग्याच्या सजगतेमुळे ‘मखाना’ चे भाव गगनाला; दीड हजार रुपयाचे दर

दर्शनी भागात हिरकणी कक्ष असूनही स्तनदा माता त्याचा वापर करण्यात कंटाळा करीत असल्याचे स्पष्ट होते. बसस्थानकांतील अनेक महिलांना हिरकणीबाबत विचारले असता ७५ टक्के महिला अनभिज्ञच असल्याचे समोर आले. त्यामुळे हिरकणी कक्षाचा वापर व त्याची माहिती महिलांपर्यंत पोचविणे आवश्‍यक आहे.

''स्तनदा माता एसटीने प्रवासासाठी स्थानकात येतात. तेथे असलेल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था झालेली असते किवा ते कुलुपबंद असते. बसस्थानक प्रशासनाने हिरकणी कक्ष सुस्थितीत व दररोज स्वच्छता करायला हवी. तरच त्याचा वापर महिलांकडून होईल.''- डॉ. अरूण गचाले, बालरोग तज्ज्ञ

A locked feeding room in a bus station.
Nashik News : मुख्यालयी थांबा अन्यथा प्रशासकीय कारवाईचा बडगा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरेंची तंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.