Nashik Agriculture: ‘लाडक्या’ शेतकऱ्यांना अखेर अनुदान! सोयाबीन, कापसाची रक्कम जमा, पहिल्या टप्यात केवळ वैयक्तिक खातेदारांना लाभ

Latest Agriculture News : पुढच्या टप्प्यात सामूहिक खातेदारांचे अनुदान जमा होईल. लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांनाही अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
farmer money
farmer moneyesakal
Updated on

येवला : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान जाहीर झाल्यावर ते देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत होती. अखेर आचारसंहितेपूर्वी या अनुदानाला मुहूर्त मिळाला असून वैयक्तिक खातेदारांना अनुदान जमा होऊ लागले आहे. पुढच्या टप्प्यात सामूहिक खातेदारांचे अनुदान जमा होईल. लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावांनाही अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. (Finally subsidy to beloved farmers)

विविध आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने मागील वर्षीच्या खरिपातील कापूस, सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने चार महिन्यापूर्वी घेतला आहे.

जिल्ह्यातील एक लाख २६ हजार हेक्टरवरील सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे ६५ कोटींच्या अर्थसाह्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना या मदतीची लॉटरी लागणार आहे. मागील वर्षी दुष्काळ तसेच घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे खरिपात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने मदतीचा निर्णय घेतला आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी परंतु दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे. शासनाने कापूस उत्पादकासाठी १५४८ कोटी तर सोयाबीन उत्पादकांसाठी २४४६ कोटींची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे अचानकपणे हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना १० हजारापर्यत आर्थिक लाभ होणार आहे.

ई- पीक पाहणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच याची मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ७८९ हेक्टर सोयाबीन तर ३४ हजार ४५६ हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र मदतीला पात्र ठरले आहे. त्यानुसार अंदाजे दोन लाखावर शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होईल. (latest marathi news)

farmer money
Sant Gadgebaba Gram Swachhta Abhiyan Awards: गट-तट विसरून, राजकारण न करता गावे आदर्श करा : डॉ. प्रवीण गेडाम

पहिला टप्प्यात अनुदान जमा!

मोठ्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी शासनाने पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरण सुरू केले आहे. जिल्ह्यातील वैयक्तिक अनेक खातेदारांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील अनुदान जमा झाले आहे. राज्यातील ९६ लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २ हजार ३९८ कोटी लाख रुपये जमा करण्यास सुरवात झाली आहे.

असे आहेत जिल्ह्यातील लाभार्थी...

पीक - प्रकार - शेतकरी संख्या - क्षेत्र (हेक्टर)

सोयाबीन - वैयक्तीक - १२२१११ - ८३६६८

सोयाबीन - सामूहिक - ३५१८११ - ८१२१

कापूस - वैयक्तीक - ३६३७६ - ३२५८१

कापूस - सामूहिक - २५८४७ - १८७५

एकूण - दोन्ही - ५३६२११ - १२६२४५

"कागदपत्रांची पूर्तता तसेच इ-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात अनुदान होत आहे.सामूहिक खातेदारांनी प्रतिज्ञापत्र दिले असून त्याचीही प्रक्रिया सुरू आहे.त्यांचेही अनुदान लवकरच जमा होईल."

- साईनाथ कालेकर, मंडळ कृषी अधिकारी, येवला

farmer money
Ahmednagar : श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 2 महिन्यांचे थकीत पगार देणार; आश्वासनानंतर सोडले उपोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.