Nashik News : ग्रामसेवक निकम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दणका

Nashik : आरोग्य विभागाकडून दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने महिरावणीचे ग्रामसेवक सुनील निकम यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Fake Document
Fake Documentesakal
Updated on

Nashik News : आरोग्य विभागाकडून दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने महिरावणीचे ग्रामसेवक सुनील निकम यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निकम यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Finally suspension action against gram sevak Nikam )

पिंपळनारेचे तत्कालीन ग्रामसेवक सुनील निकम यांनी बदली करण्याकामी मेंदूच्या आजाराचे बोगस प्रमाणपत्र सादर केले असून, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी तक्रार फेब्रुवारी २०२४ मध्ये विभागीय आयुक्तांकडे केली होती. या तक्रारींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार श्रीमती मित्तल यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

या समितीने निकम यांनी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करत चौकशी अहवाल सादर केला. त्यानुसार श्री. निकम यांना सद्यःस्थितीत मेंदूबाबत कोणताही गंभीर स्वरूपाचा आजार आढळून येत नाही, या निष्कर्षाच्या आधारे श्रीमती मित्तल यांनी ग्रामसेवक निकम यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, येवला येथे राहील, असे मित्तल यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. (latest marathi news)

Fake Document
Nashik News : स्वेटरविक्रेत्या तिबेटींनी धरली उच्च शिक्षणाची कास; नाशिकमधील तिघे झाले डॉक्टर

आठवडाभरात दोघे निलंबित

आठवड्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख ५७ हजार ७५० रुपयांच्या अपहार प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यापाठोपाठ लागलीच महिरवणीच्या ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वीच संजय पाटील यांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याने त्यांचे निलंबन केले होते. यापाठोपाठ आता सुनील निकम यांच्यावर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे निलंबनाची कारवाई झाली आहे. या कारवाईनंतर, दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून बदल्या करण्यात आलेल्या ग्रामसेवकांची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

Fake Document
Nashik News : शिर्डी-साक्री बायपासला उदासीनतेचा अडसर; रस्ता काँक्रिटीकरणाचे काम ठप्प झाल्याने नाराजीचा सूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.