देवळा : देवळा- खर्डे रस्त्यावरील शिंदेवाडीतील विनोद बाजीराव शिंदे यांच्या घराला मंगळवारी (ता.१३) दुपारी एक ते दीडच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील रोख रकमेसह इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
यात सुमारे चौदा लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले. देवळा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब वेळेवर पोहोचल्यामुळे आग आटोक्यात येऊन मोठी हानी टळली. (Nashik Fire Accident 14 lakhs loss in fire at Deola)
घराला आग लागली, त्यावेळी घरात कोणी नसल्यामुळे आग लागल्याचे लवकर ध्यानात आले नाही. घरातून धूर निघू लागल्यानंतर महिलांनी मदतीसाठी पुकारा सुरू केला. त्यानंतर परिसरातील स्थानिक तरुणांनी मदतकार्य सुरू केले.
परंतु घराच्या छताला केलेल्या पीओपीमुळे आगीने तीव्र स्वरूप धारण केल्याने आटोक्यात येत नव्हती. उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांनी देवळा नगरपंचायतीचा अग्निशामक बंब मागवीत मदतकार्य सुरू केले.
घटनास्थळी नगरपंचायतीचे गटनेते संजय आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, पंकज अहिरराव, लक्ष्मीकांत आहेर, किशोर आहेर, प्रदीप आहेर, राजेंद्र आहेर, नगरपंचायत कर्मचारी यांनीही आग विझविण्यासाठी सहकार्य केले.
अग्निशमन बंब त्वरित आल्यामुळे आग लवकर आटोक्यात आली. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत या आगीत घरातील रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, संसार उपयोगी साहित्य, टीव्ही, फर्निचर आदी सर्व जळून खाक झाले.
त्यात सारे मिळून १४ लाखांचे नुकसान झाले आहे. देवळा सजाचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.