सटाणा : शहरालगतच्या चौगाव बर्डीवरील बंद घरांना बुधवारी (ता. २०) आकस्मित लागलेल्या आगीत सहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
त्यात रोख रकमेसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात. (Nashik Fire Accident 2 houses on fire at Chaugaon Bardi in Satana More than 6 lakhs in damages)
चौगांव बर्डीवर राहत असलेल्या कौशल्याबाई वसंत सोनवणे व शेजारील शंकर रामदास गायकवाड या दोघांची घरे दिवसभर बंद होती. कौशल्याबाई कांदा लागवडीचे काम घेतात. सध्या कांदा लागवडीचा हंगाम असल्याने त्या सकाळपासून काम घेतलेल्या ठिकाणी गेल्या होत्या.
त्यांच्या घरात मजूरांना देण्यासाठीची ८० हजार रुपयांची रोकड होती. श्री. गायकवाड हे नगरपालिकेचे कर्मचारी असल्याने ते सकाळपासून घरी नव्हते.
दोघांची घरे बंद होती. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास कौशल्याबाई यांच्या घरातून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेजारील श्री. गायकवाड यांच्या घराला आगीची झळ पोहोचली.
आगीत कौशल्याबाई यांच्या घरातील रोख ८० हजार रुपये, दूरचित्रवाहिनी संच, संसारोपयोगी वस्तू व धान्य जळून खाक झाले. श्री. गायकवाड यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात. सटाणा अग्निशमन बंबने आग आटोक्यात आणली.
सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तलाठी जयप्रकाश सोनवणे, कोतवाल रवी बच्छाव यांनी घटनेचा पंचनामा केला असता, दोन्ही घरांचे एकूण सहा लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे आढळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.