Nashik Fire Accident : म्हसरूळ टेक भागात आगीने 4 घरे भस्मसात

The incident of fire in Mhasrul Tech area took place on Wednesday (5th) afternoon.
The incident of fire in Mhasrul Tech area took place on Wednesday (5th) afternoon.esakal
Updated on

जुने नाशिक : म्हसरूळ टेक भागात आग लागण्याची घटना बुधवार (ता.५) दुपारी घडली. आगीत चार घरे जळून भस्म सात झाली आहे. चारही घरातील संसार उपयोगी साहित्य असा हजाराचा ऐवज जळून राख झाला.

एक जण जखमी झाला. तर अग्निशामक विभागाचा एक कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरल्याने अत्याव्यस्त झाल्याचा प्रकार घडला. अग्निशामक नंबर वेळीच दाखल झाल्याने अनर्थ टळला. (Nashik Fire Accident 4 houses gutted by fire in Mhasrul tek area new

आगेतून भरलेली सिलेंडर बाहेर काढताना अग्निशामक विभागाचे कर्मचारी.
आगेतून भरलेली सिलेंडर बाहेर काढताना अग्निशामक विभागाचे कर्मचारी.esakal

बुधवार (ता.५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास म्हसरूळ टेक भागातील जुन्या घरांनी अचानक पेट घेतला. त्यात महेश पवार, सुरेश साळुंके, सागर पेंढारकर, श्री कुंभकर्ण अशा चार घरांचे जळून नुकसान झाले. कोमल पवार यांना घरात असताना काहीतरी जळत असल्याचा वास आला.

त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. तेवढ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पवार कुटुंबीय घराच्या बाहेर पडले. साळुंखे कुटुंबीयांनाही घरात धूर निघत असल्याचे आढळून आले. त्यांनीही घराच्या बाहेर पळ काढला. श्री. कुंभकर्ण यांच्या घरात कारखाना होता. तो बंद असल्याने ते घर बंद होते. इतर तीन घरांमध्ये मात्र कुटुंबीय राहत होते.

आग लागली त्यावेळेस घरांमध्ये दोन लहान मुले, दोन महिला, आणि दोन पुरुष असे सहा जण होते. घटना वेळीच लक्षात आल्याने ते घरातून बाहेर पडल्याने अनर्थ टाळला. ते बाहेर पडतात आगीने रुद्र रूप धारण केले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखीनच वाढली.

अग्निशामक विभागास माहिती मिळताच. अवघ्या काही वेळात बंब घटनास्थळी दाखल झाले. येथील अरुंद गल्ली आणि जुन्या वाड्यांचे वाढीव बांधकामामुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यास कसरत झाली. शेवटी घटनास्थळापासून लांब बंब उभे करून बंबाच्या पाईपला अतिरिक्त पाईप जोडून आगेवर पाण्याचा मारा करण्यात आला.

दोन तासानंतर आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशामक विभागाचे अधिकारी संजय बैरागी, राजेंद्र बैरागी यांच्या मार्गदर्शनात लीडिंग फायरमन इकबाल शेख, सोमनाथ थोरात, इसाक शेख, ज्ञानेश्वर दराडे, अनिल गांगुर्डे, उदय शिर्के, नाजिम देशमुख, एम एस पिंपळे, एन पी म्हस्के, डी आर गाडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत मुख्यालय दोन, पंचवटी एक आणि के के वाघ अग्निशामक केंद्र एक असे चार बंबाच्या सहाय्याने आगेवर नियंत्रण मिळविले.

The incident of fire in Mhasrul Tech area took place on Wednesday (5th) afternoon.
Traffic Management : हनुमान जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग

आगेत घरातील सामान काढण्यासाठी आत गेलेले सागर पेंढारकर यांच्या अंगावर जिना कोसळल्याने ते जखमी झाले. दरम्यान आगेत घरातील लाकडी स्लॅब कोसळण्याच्या घटनाही घडल्या. तर अग्निशामक कर्मचारी सोमनाथ थोरात आगेवर पाण्याचा मारा करत असताना त्यांच्या नाका-तोंडात धूर गेल्याने त्यांना श्वास गुदमरून त्रास झाला.

इतर सिलेंडर अग्निशामक कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याने मोठे दुर्घटना टळली. आगेवर नियंत्रण मिळाले तरी काही भागात धुर येत असल्याने त्याठिकाणी एक बंब दक्षतेसाठी नियुक्त करून ठेवण्यात आला होता.

जुने वाड्यांचा त्रास

जुन्या वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्याचे धोकादायक अवस्थेत आहे. आणि त्यांच्या वाढीव बांधकामामुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे घटनास्थळापर्यंत अग्निशामक वाहन पोहचणे शक्य झाले नाही.

स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने कारवाई करत ते धोकादायक वाडे काढून रस्ते मोठे करण्यात यावे. अशी मागणी केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

The incident of fire in Mhasrul Tech area took place on Wednesday (5th) afternoon.
Nashik News : पालखेड पाटबंधारे विभागाकडून 105 टक्के पाणीपट्टी वसुली

सामाजिक धार्मिक एकतेचे दर्शन

अग्निशामक कर्मचारी इसाक शेख यांची ड्युटी नसताना त्यांना आग लागल्याचे वृत्त समजतात. ते कर्तव्यावर हजर झाले. रोजा असताना त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे लीडिंग फायरमॅन इकबाल शेख, कर्मचारी नाजीम देशमुख अशा तिघांचाही रोजा असताना कर्तव्यास प्राधान्य दिले.

तसेच घटनास्थळापर्यंत अग्निशामक विभागाचे बंब पोहोचण्यासाठी मुलतानपुरा येथील मुस्लिम तरुणांनी रस्त्यातील दुकाने वाहने तसेच नागरिकांना बाजूला करून बाबांना मोकळा रस्ता करून दिला. आग विझवून जोपर्यंत बंब माघारी गेले नाही तोपर्यंत सर्व तरुण रस्त्यावर तळ ठोकून होते. या घटनेतून धार्मिक सलोखा दिसून आला.

"घरात असताना वायर जळाल्यासारखा वास आला. विद्युत पुरवठा खंडित झाला. शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असावी. त्यानंतर केवळ आग दिसून आली."

- कोमल पवार प्रत्यक्षदर्शी

"मुलगा अंड्याची पोळी करतं होता अचानक धूर झाला. घरातून धुर येत असल्याचे लक्षात आल्याने बाहेर पडलो. आणि क्षणातच आग वाढली."- सुरेश साळुंके, पीडित रहिवाशी

रस्त्याला अडथळा ठरणारे आणि धोकादायक वाडे मालकांना पुन्हा नोटीस बजावण्यात येईल. तसेच वाडे काढून घेण्यासंदर्भात जे कायदेशीर कारवाई असेल ती करण्यात येईल.

- नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी

The incident of fire in Mhasrul Tech area took place on Wednesday (5th) afternoon.
Nashik News : ई-पॉस यंत्राचा वापर अत्यावश्यक; येवल्यात कृषी अधिकाऱ्यांची पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.