Nashik Fire Accident: बोरगाव येथील घराला लागली आग; विझवायला गुजरातची नैसर्गिक आपत्ती यंत्रणा धावली

Nashik Fire Accident
Nashik Fire Accidentesakal
Updated on

Nashik Fire Accident : तालुक्यातील सापुतारा वणी महामार्गावरील बोरगाव येथे रात्री आठ ते सव्वा आठच्या दरम्यान मालक हरी आनंदा भोये व ग्रामपंचायत सदस्या सुशिला पांडुरंग भोये यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली.

प्रत्यक्ष दर्शी अल्केश सुराणा यांनी सांगितले की, सव्वा आठच्या दरम्यान घराजवळून जात असतांना घरात काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. (Nashik Fire Accident Natural disaster system of Gujarat rushed to douse house fire in Borgaon)

काका पुतण्या आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळी सुशिला भोये व त्यांचा मुलगा ह्रतिक घरात अडकून पडले होते. गाळयांमध्ये पुठ्ठे व कुरकुरे असल्याने क्षणार्धात आगीने संपूर्ण घरालाच घेरले.

क्षणाचही विलंब न करता अल्केश सुराणा व योगेश पगारे यांनी सुशिलाला व ह्रतिकला खिडकी तोडून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. सुशिला यांच्या तोंडाला भाजला आहे तर मुलगा ह्रतिक याचा हात भाजला आहे.

दोघांवर उपचार सुरु आहेत. रात्रीची वेळ असल्याने सर्वत्र एकच धावपळ उडाली होती. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करीत होते. सरपंच अशोक गवळी, लक्ष्मण गायकवाड, गणेश गायकवाड, भावडू चौधरी

यांनी तात्काळ दखल घेत गावातील ट्रॅक्टरचे टॅंकर मागविण्यात आले. आग आटोक्यात येत नसल्याने सापुतारा हाॅटेल असोसिएशनचे अध्यक्ष व उद्योजक तुकाराम कर्डीले यांनी आहवा डांग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेश भाई पटेल यांना कळविले असता त्यांनी तात्काळ सापुतारा चिफ ऑफिस अर्जून चावडा व नायब तहसिलदार राठोड यांनी तात्काळ दखल घेऊन बोरगाव येथे सापुतारा येथील अग्निशमन दल पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र तो पर्यंत बराच उशीर झाल्याने संपूर्ण घर व गाळे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. गावकऱ्यांनी हंडे, पिंप भरून डोक्यावर पाणी वाहून आणता आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. यापुर्वी हि तीन ते चार वेळा बोरगाव येथे लागलेली आग विझविण्यासाठी गुजरात राज्यातील अग्निशमन दल मदतीला धावून आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Fire Accident
Mumbai-Agra highway Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू

मोठा अनर्थ टळला

या घराजवळील गाळ्यांमध्ये स्ट्राबेरी पॅकिंगचे पुठ्ठ्याचे खोके गोडाऊन, चपलाचे गोडाऊन, मल्चिंग पेपर, कपड्याचे दुकान आदीं माल होता. यांनी जर पेट घेतला असता तर खुप मोठा अनर्थ घडला असता.

जबाबदार अधिकारी विना पोरका तालुका

दरम्यान सुरगाणा तहसिलदार सचिन मुळीक यांची बदली झाली आहे. या ठिकाणी नायब तहसिलदार पदी प्रज्ञा भोकरे यांच्याकडे तात्पुरता पदभार होता. त्यांची बदली कळवण येथे झाली आहे.

सुरगाणा येथे नवीन तहसिलदार यांची अद्यापही नेमणूक न झाल्याने अधिकारी विना महसूल विभागाचे गाडा हाकणे प्रशासनाकडून सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाच नसेल तर दाद मागायची कोणाकडे अशी अवस्था तालुक्याची झाली आहे.

गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसिलदार हि पदे ही रिक्तच आहेत. त्यामुळे पेसा क्षेत्र असून ही अधिकारी विना तालुका पोरका आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार, आमदार नितीन पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी संपर्क साधत माहिती जाणून घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Nashik Fire Accident
Fire Accident : नेरळमधील डेअरीत शॉर्टसर्किटमुळे स्फोट; शटर १० फूट उडाले;लाखोंचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.