Nashik Fire Accident: शिंदे गावातील आग तब्बल 18 तासानंतर आटोक्यात; दीड कोटी रुपयांचे नुकसान

Warehouse burnt down in Shinde villagers alleged that fire brigade arrived late
Warehouse burnt down in Shinde villagers alleged that fire brigade arrived lateesakal
Updated on

Nashik Fire Accident : शिंदेगाव येथील नायगाव रोडवरील एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यांना रविवारी (ता.५) रात्री साडेसातच्या सुमारास आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र, तब्बल १८ तासानंतर सदर आग आटोक्यात आली.

यामुळे शिंदेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या इतर कंपन्यांनी व रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आगीत तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Nashik Fire Accident Shinde village fire under control after 18 hours Loss of one half crore rupees)

तिरुपती लेनो ही बारदान कंपनी, तर युनिले कोटिंग या दोन्ही कंपन्यांना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. आग कशामुळे लागली याबाबतचे निश्चित कारण समजू शकले नाही. परंतु या आगीने रौद्ररूप धारण केले.

परिणामी परिसरातील शिंदेगाव, पळसे, चेहेडी आधी भागात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसू लागल्याने संपूर्ण भागात काळोख पसरला होता.

आग लागल्याचे समजताच नाशिक, नाशिक रोड, सिन्नर येथील अग्निशामक दलाचे तब्बल १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग भडकली व त्यामुळे जवळच बारदान कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रात्रभर अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता.६) सुद्धा काही प्रमाणात आग सुरूच असल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पाण्याचा मारा करून आग विझविली.

Warehouse burnt down in Shinde villagers alleged that fire brigade arrived late
Nashik Fire Accident: शिंदे येथे गुदाम जळून खाक! फायर ब्रिगेड उशिराने पोचल्याचा ग्रामस्थांचा आरोप

आग तब्बल १८ तासानंतर आटोक्यात आल्याने नागरिकांनी व आजूबाजूच्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी व रहिवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला.

आगीचे वृत्त समजल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व माहिती घेतली.

त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे नाशिक रोड येथील अधिकारी व कर्मचारी बेंद्रे साळवे, आहेर गायकवाड, काळे, खर्जुल, जाधव, आडके आदींनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Warehouse burnt down in Shinde villagers alleged that fire brigade arrived late
Nashik Fire Accident: चारा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आग! संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाची गाडी पाठविली परत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.