Nashik Fire Accident : सप्तशृंगी गडावर जाणारी टॅम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

Nashik News : वाहनातील प्रवासी भाविकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरुप बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
Fire Caught traveller at vani
Fire Caught traveller at vaniesakal
Updated on

वणी : सप्तशृंगी गड घाट रस्त्यावरील पायरी रस्ता कॉस्गींग परीसरात टेम्पो ट्रॅव्हलर वाहानाने सोमवारी, ता. २० रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान पेट घेतला. यावेळी वाहनातील प्रवासी भाविकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरुप बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Nashik Fire Accident Traveler bus going to Saptashrungi Fort)

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आज रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे नांदुरी ते सप्तशृंगी गड या दहा किमी रस्त्याने गडावर जात असतांना वाहनाच्या इंजिनमधून धुर येवू लागल्याने चालकाने वाहन थांबवले. यावेळी प्रवाशांनीही सतर्कता बाळगून वाहनातून पटापट बाहेर पडले.

आणि काही मिनीटातच गाडीने पेट घेवून संपूर्ण वाहनाने पेट घेतला. यावेळी मार्गावरुन गडावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिकांनी याबाबतची माहीती ट्रस्ट व ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थ, ट्रस्टचे आपत्तीव्यवस्थापनाचे जवान व रोप वे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशामक यंत्रासह घटनास्थळी धाव घेतली. (latest marathi news)

Fire Caught traveller at vani
Nashik Fire Accident: सटाणा शहरात मध्यरात्री पुन्हा भीषण अग्नितांडव! 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान; 2 महिन्यातील तिसरी घटना

यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा टॅकरला पाचार करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक व रोप वे ट्रॉली येथील कर्मचारी यांनीही अग्निशामक यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. वाहनातूल भाविक हे आंध्र प्रदेशातील असल्याची माहीती असून वाहनात २ चालक, १० महिला, ९ पुरुष असे एकूण २१ प्रवासी सदर वाहनात होते.

हे सर्व भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेवून भाडोत्री टेम्पो ट्रव्हलरने वणी गडावर देवी दर्शनासाठी येत होते. गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, बबलु जहागिरदार, उमेश मिश्रा, जगनु उपाध्ये, निलेश परदेशी, शांताराम गवळी, मयुर बेनके, साजन बेनके आदींंसह ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक, रोपवेचे सुरक्षा पथक यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले व भाविकांना दुसऱ्या वाहनातून गडावर आणण्यात आले.

Fire Caught traveller at vani
Pune Fire Accident : बसला आग लागली, रुग्णवाहिका, अग्निशामक अडकली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.