Nashik Fire Accident : अभोण्यात गाळ्यांना भीषण आग; 3 दुकानांची झाली राखरांगोळी

Nashik News : अभोणा येथील नांदुरी रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी सहा पत्र्याच्या गाळ्यांपैकी तीन गाळ्यांना सोमवारी (ता.११) रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली.
Fire broke out at shops on Nanduri Road.
Fire broke out at shops on Nanduri Road.esakal
Updated on

अभोणा : येथील नांदुरी रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी सहा पत्र्याच्या गाळ्यांपैकी तीन गाळ्यांना सोमवारी (ता.११) रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. (Nashik Fire in Abhona marathi news)

येथील रेडियमच्या दुकानापासूनच आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रेडियम दुकानासह लगतची दूध डेअरी व मोटारसायकल गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. इतर तीन गाळ्यातील साहित्य बाहेर काढून गाळे रिकामे करण्यात आले. तीनही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेचे वृत्त समजताच गावातील युवकांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी तत्काळ कळवण नगरपरिषदेच्या अग्निशमनदलास संपर्क साधला. अग्निशामक बंबद घटनास्थळी येईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अखेर अग्निशमन बंबाने रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. आगीचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. गावातील युवक व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कळवणच्या अग्निशमनची पहिलीच सेवा

गेल्याच आठवड्यात कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या वाढदिवसानिमित्त अग्निशमन सेवा सुरू करण्यात आली होती. तालुक्याचा विस्तार पाहता परिसरात दुर्घटना घडली तर सटाणा किंवा मालेगाव अग्निशमन यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत होते. नव्यानेच लोकार्पण झालेल्या अग्निशमन यंत्रणेमुळे काहीअंशी पुढील धोका टळला. (Latest Marathi News)

Fire broke out at shops on Nanduri Road.
Bhopal Fire: भोपाळमध्ये मंत्रालयात अग्नितांडव, महत्वाचे कागदपत्रे जळून खाक, आगीचं कारण काय?

ऐन उभारीच्या काळात लाखोंचे नुकसान

एक- दोन वर्षांपूर्वीच कर्ज काढून उभारण्यात आलेले व्यवसाय आता कुठे बऱ्यापैकी सुरू झाले होते. त्यात ऐन उमेदीच्या काळात हा आगीचा भडका होत्याचे नव्हते करून गेला. परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या डेअरीचे साहित्य, संगणक, दूध संकलन कंटेनर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, शेतकऱ्यांचे पेमेंट रजिस्टर, पशुखाद्य वाटप रजिस्टर, काही रोख रक्कम, सर्व आर्थिक नोंदी खाक झाल्या.

उपासमारीची वेळ

रेडियम दुकानातील सर्व महागडी मशिनरी, रेडियम रोल, गॅरेजची विविध मशिनरी, स्पेअरपार्ट, हत्यारे व बॅटरी दुकानातील सर्व इलेक्ट्रिकल साहित्य, बॅटऱ्या, इतर पूरक साहित्य, कुशन साहित्य, कार डेकोरचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, स्लायडिंग खिडकी व्यवसायातील साहित्य आगीत भस्मसात झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. प्रत्येकी पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

Fire broke out at shops on Nanduri Road.
Nashik Fire Accident: उड्डाण पुलावर ट्रकभर बटाटे खाक! लेखानगर परिसरातील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()