नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळात उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांना आश्रमशाळांमध्येच प्रथमोपचार मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमध्ये बाह्य स्त्रोतांद्वारे परिचारिकेची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतच प्रथमोपचार होणार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९९ शासकीय आश्रमशाळा असून, त्यात सुमारे दोन लाख आदिवासी विद्यार्थी धडे गिरवतात. (First aid is now given to students in ashram school itself Decision on Tribal Development department )