Nashik Rain Update : जिल्ह्यातील पहिले भावली धरण भरले! दारणा 75 टक्के भरल्याने 1872 क्युसेकने पहिला विसर्ग

Nashik News : यंदाचा दारणा धरणातून १८७२ तर नांदूर मध्यमेश्वर ८०७ क्युसेसने आजपासून पहिला विसर्ग सुरु झाला.
Bhavli Dam
Bhavli Damesakal
Updated on

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही सलग सात दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील पहिले भावली धरण भरले. तसेच यंदाचा दारणा धरणातून १८७२ तर नांदूर मध्यमेश्वर ८०७ क्युसेसने आजपासून पहिला विसर्ग सुरु झाला. (Nashik first Bhavli dam in district filled)

जोरदार पावसामुळे आज दारणा, वाकी, भाम या नद्या अधिक जोराने प्रवाहित झाल्या. एकट्या इगतपुरी तालुक्यात २४ तासात पुन्हा विक्रमी ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दारणा,भाम व वाकी या नद्या या मोसमात सलग सहा सात दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहेत.

मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात आठ दिवसापासून पावसाचे सातत्य कायम राहीले आहे. सलग होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणसाठा वाढण्यास मोठी मदत झाली असली तरी भात शेतात तलावाचे स्वरूप दिसून आले. (latest marathi news)

Bhavli Dam
Pune Rain Update : शिरगांव येथे रस्त्यावर दरड कोसळली, भिमाशंकर- भोरगिरी कडे जाणारी वाहतूक ठप्प

पहिलेच भावली ओव्हरफ्लो

इगतपुरी शहर : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पहिलेच भावली धरण बुधवार ( ता.२४ ) दुपारी साडे चारच्या सुमारास शंभर टक्के भरले. तालुक्यात १२ पेक्षा अधिक लहान मोठी धरणे आहेत. त्यातील भावली धरण हे असून धरणाच्या सांडव्यावरून आता पाणी वाहू लागले. हे पाणी दारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जाऊन दारणा धरणातून पुढे हे पाणी जायकवाडी धरणात जाऊन मराठवाड्याची तहान भागवणार आहे.

दारणा धरण ७५ टक्के भरल्यामुळे दारणा धरण क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची वाढ झाली आहे. बुधवारी दारणा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून १८७२ क्यूसेक वेगाने दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर जर असाच राहिला तर दारणा धरणातून विसर्ग हा आणखी वाढवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Bhavli Dam
Pune Rain Update : घाटमाथ्यावर वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरु; आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.