Nashik News : शाळेचा पहिला दिवस होणार अविस्मरणीय; शैक्षणिक जागृतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

Nashik News : जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची घंटा शनिवारी (ता. १५) निनादणार असून, शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
An ongoing cleanliness drive at Zilla Parishad School in Bijnor.
An ongoing cleanliness drive at Zilla Parishad School in Bijnor.esakal
Updated on

नामपूर : जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची घंटा शनिवारी (ता. १५) निनादणार असून, शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. शाळा स्तरावर समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुस्तके पोहोच झाल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत पुस्तकांनी होईल. (First day of Nampur school will be unforgettable)

बागलाण तालुक्यात शैक्षणिक जनजागृतीसाठी गुरुवारी (ता. १३) शाळा स्वच्छता मोहिम, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, शाळा व्यवस्थापन समिती बैठका, पालक भेटी आदींच्या माध्यमातून शैक्षणिक पर्वाचा श्रीगणेशा झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के मुले शाळेत उपस्थित ठेवण्यासाठी पालकांना आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील पालकांनी मराठी शाळेत प्रवेश घेण्याबाबत सोशल मिडियावर विविध शिक्षकांच्या ग्रुपमध्ये जोरदार जाहिरातबाजी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गुलाबाचे फुले आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, विद्यार्थी सजविलेल्या वाहनांतून मिरवणूक.

शिक्षण पालखी आदी उपक्रम बागलाण तालुक्यात राबविले जाणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षणप्रेमी, अधिकारी शाळांमध्ये मुलांचे स्वागत करणार आहेत, अशी माहिती बागलाणच्या गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, विस्तार अधिकारी विजय पगार यांनी दिली. (latest marathi news)

An ongoing cleanliness drive at Zilla Parishad School in Bijnor.
Nashik News : ‘इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब’ची जागा परत करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची ‘सीपीआरआय’ला सूचना

गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात इंग्लिश शाळांचे पेव फुटल्याने जिल्हा परीषद शाळांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा इ-लर्निंग व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करु लागल्याने गुणवत्ता संवर्धन होत आहे. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसापासून तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडविण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. तालुक्यातील ५५ शाळांना मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मंगळवारी (ता. १८) शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळांना दिले आहे. दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश करतील, त्यावेळी त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी असल्यास बालकांना शाळेची ओढ लागते. शाळा प्रवेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध शिक्षणपूरक उपक्रम राबविण्याचे शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना आदेश दिले आहेत.

An ongoing cleanliness drive at Zilla Parishad School in Bijnor.
Nashik News : दुष्काळी मदतीपासून 52 हजार शेतकरी वंचित!

विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण, गुलाबाचे फूल, चॉकलेट देऊन स्वागत केले जाणार आहे. शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांनी शाळेत जाऊन शालेय परिसर स्वच्छ करणे, सुशोभित करण्याकडे लक्ष द्यावे. ३० जूनपर्यंत १०० टक्के आधारकार्ड काढणे, योगदिन साजरा करणे, ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, शालेय आवारात वृक्षारोपण करणे, व्यावस्थापन समितीची सभा घेणे, पटनोंदणीबद्दल माहिती देणे, गृहभेटी, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गोड पदार्थ देणे, पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

"२८ जूनला होणाऱ्या स्पेलिंग-बी स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांची तयारी करणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी भविष्यववेधी शिक्षणपद्धती राबवून नावीन्यपूर्ण सहशालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. शाळांनी वृक्षारोपण मोहिम प्रभावीपणे राबवावी. शाळा व्यवस्थापन समित्यांचे पुनर्रचना करावी. शाळांमध्ये परसबाग बनवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून लोकसहभागातून शाळांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा."- चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी, बागलाण

An ongoing cleanliness drive at Zilla Parishad School in Bijnor.
Nashik News : गोदाघाटावर एका कामावर दुहेरी खर्चाची भीती; सिंहस्थातील कामे ‘नमामि गोदा’ प्रकल्पातून वगळण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.