पिंपळगाव बसवंत : समाजातील विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यासाठी सर्वांनाच सर्वच सुखसुविधा मिळतात असे नाही. त्यासाठी काही विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. वाटेतील हे काटे त्याच्या परिस्थितीला मात करण्यासाठी बळ देतो. सावित्रीच्या लेकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीसाठी आज हा संघर्ष पाचवीलाच पुजलेला.
अशाच विमुक्त जातीतील कामटी समाजातील निफाड तालुक्यातील कुंदेवाडीची पहिली मुलगी निशिगंधा परशराम जाधव निशिगंधा परशराम नुकतीच प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा राज्यशास्त्र विषयात उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे कोणताही विशेष क्लास न लावता महाराष्ट्र सेट परीक्षा पास झाली. डोंगराएवढ्या संकटाशी झुंज देत निशिगंधा जाधव हिने आदर्श उभा केला आहे. (first girl from Kamti community passed SET)