Nashik News : सोनपंखी कमळ पक्षाचे प्रथमच दर्शन; नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आगमन

Nashik : पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने स्थलांतरित सोनपंखी कमळपक्षी प्रथमच पक्षी अभयारण्यात आले आहेत.
Sonpankhi Kamal birds
Sonpankhi Kamal birdsesakal
Updated on

नाशिक : नांदूरमध्यमेश्वर या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने स्थलांतरित सोनपंखी कमळपक्षी प्रथमच पक्षी अभयारण्यात आले आहेत. त्याला बघण्यासाठी पक्षी अभ्यासक गर्दी करू लागले आहे. भारतामध्ये १३०१ जातीच्या पक्षापैकी ६११ प्रकार महाराष्ट्रात तर २७५ जाती या अभयारण्यात आढळतात. सोनपंखी कमळपक्षी याचे शास्त्रीय नाव मेटोपिडिअस इंडिकस असे आहे. (First sighting of Sonpankhi Kamal birds at Nandur Madhyameshwar Bird Sanctuary )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.