वणी : ‘सौ बार काशी... एक बार मार्कडेय ऋषी’ असे धार्मिकदृष्ट्या म्हटले जाणाऱ्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवारी (ता. २) सोमवती अमावस्येनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवावर प्रशासनाने असुरक्षित मार्ग व गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने बंदी घालत भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव केला.
त्यामुळे शेकडो वर्षांची भाविकांची परंपरा खंडीत होण्याबरोबरच हजारो भाविकांची अखंडीतपणे सुरु असलेली सोमवती अमावस्येची मार्कंडेय वारी खंडीत झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. (First step darshan of Markandey Mountain)