Nashik News : सवंदगाव व म्हाळदे शिवारातील पंधरा मच्छीमार रविवारी (ता. ४) मच्छीमारी करत असताना पुराचे पाणी वाढल्याने गिरणापात्रात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व शहरातील तैराक ग्रुपने अथक प्रयत्न केले. त्यांना यश न आल्याने धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे बारा जवान घटनास्थळी दाखल होते. या सर्वांना २२ तासांनंतर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मासेमाऱ्यांनी व त्यांच्या नातेवाईक, प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. ()
गिरणा नदीला पूर येण्यापूर्वी प्रशासनातर्फे माहिती देऊनही पंधरा मच्छिमार तरुण रविवारी (ता. ४) गिरणापात्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र चणकापूर व पुनंद धरणातून सुमारे २७ हजार क्यूसेक वेगाने पाणी गिरणापात्रात सोडण्यात आल्याने दुपारी चारच्या सुमारास हे मच्छीमार गिरणापात्रातील मोठ्या खडकावर अडकले. त्यांच्या बचावासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरी टाकली; मात्र त्यात यश आले नाही.
रात्री उशिरापर्यंत धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने बोट पाण्यात उलटण्याच्या भीतीने ते जवान थांबले. सोमवारी (ता. ५) सकाळी साडेदहाच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने अडकलेल्यांना जेवण पाठविण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस उपअधीक्षक तेगबिरसिंह संधू, प्रांताधिकारी नितीन सदगीर, अग्निशमन दलाचे शकील तैराक व जवान उपस्थित होते.
सोमवारी (ता. ५) दुपारी साडेबाराच्या सुमारास ओझर येथील वायुदलाचे हेलिकॉप्टर व त्यांचे तीन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन फेऱ्या करून या मच्छिमारांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांची सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. पवारवाडी पोलिस ठाण्यात पंचनामा करून त्यांना सोडण्यात आले. यात धुळे येथील चार, तर मालेगाव येथील अकरा जणांचा समावेश आहे. (latest marathi news)
अडकलेल्यांची नावे अशी
अब्दुल जब्बार, अब्दुल खालिक, शहबाज खान, अब्दुल हमीद (चौघे रा. धुळे), उस्मान गणी बद्रुद्दीन, जमशेद अहमद, मुक्तार अहमद, नजीम खान, अनिस खान, मोहम्मद सऊद, सुफियान अहमद, एकबाल अहमद, वसीम अहमद, रिहान अहमद, अख्तर हसेन (सर्व रा. मालेगाव)
अग्निशमनने वाचविले प्राण
यापूर्वी २००७-०८ मध्ये निंबोळा गावाजवळ सात ते आठ जण गिरणा नदीपात्रात वाळू भरण्यासाठी गेले. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात अडकले. २०१३ मध्ये कॅम्प भागातील गणेश कुंडाजवळ दोन लहान मुले मोसम नदीपात्रात वाहून जात असताना त्यांचेही प्राण वाचविले होते. २०२३ मध्ये येथील कचरा डेपोजवळ गिरणा नदीजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला व लहान मुलगा पाण्यात अडकले व मासेमारी करणाऱ्या एकाला अग्निशमन दलाचे जवान शकील तैराक व त्यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढले.
बाहेर काढण्यावरून राजकारण
नदीपात्रात अडकलेल्यांना काढण्यावरून शहरातील पूर्व भागात राजकारण सुरू झाले आहे. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख, एजाज बेग हे तिघे हेलिकॉप्टर मागविल्याचे श्रेय घेत आहेत. सोशल मीडियावर राजकारण केले जात आहे. त्यामुळे शहरातील पूर्व भागात अडकलेल्यांना काढण्यावरून हा विषय चर्चेचा बनला आहे.
''अग्निशमन दलाच्या जवानांनी मासेमाऱ्यांना बचावासाठी अनेक प्रयत्न केले. पाण्याचा प्रवाह जादा असल्याने बचाव करताना अडचणी येत होत्या. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आयुक्त रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकारी यांना हेलिकॉप्टर पाठविण्यासंदर्भात विनंती केली होती.''- संजय पवार, अधीक्षक अग्निशमन द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.