नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीत सुमारे साडेपाच हजार मतदारांनी ‘नोटा’ बटण दाबून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना नापसंती व्यक्त केली आहे. विशेषत: या तिन्ही मतदारसंघांसाठी आलेल्या पोस्टल मतदानातही १०६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला, हे विशेष. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षांकडून उमेदवार दिले जातात. तसेच, अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवितात.