Durban Comrade Marathon: कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नाशिकचा झेंडा! 7 स्पर्धकांचा सहभाग

Durban Comrade Marathon
Durban Comrade Marathonesakal
Updated on

Durban Comrade Marathon : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे रविवार (ता.११) रोजी झालेल्या ८९ किलोमीटरच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या सात धावपटूंनी ही स्पर्धा निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण करत झेंडा रोवला आहे. (Nashik Flag in Durban Comrade Marathon Participation of 7 contestants)

जगातील सर्वात कठीण स्पर्धामध्ये या स्पर्धेचा समावेश होतो. अगदी मोजके धावपटू कॉम्रेड स्पर्धेसाठी पात्र होतात. यावर्षी संपूर्ण भारतातील ४०३ धावपटू सहभागी झाले. त्यातील ३५ धावपटू हे पुण्यातील, तर नाशिकचे सात धावपटू सहभागी झाले.

त्यांनी गेल्या अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ही स्पर्धा ११ तास ४५ मिनिटात पूर्ण करणे गरजेचे असते.

नाशिकच्या डॉ. धनंजय डुबेरकर यांनी हे अंतर ९ तास १८ मिनिटात, किरण गायकवाड यांनी ९ तास ३१ मिनिटात, महेंद्र छोरीया यांनी ९ तास ५२ मिनिटात, संदीप हंडा यांनी १० तास २६ मिनिटात, प्रशांत डबरी यांनी ११ तास २९ मिनिटात, सागर पाटील यांनी ११ तास ३० मिनिटात तर डॉ. पंकज भदाणे यांनी ११ तास ३२ मिनिटात पूर्ण केले.

या सर्व धावपटूंनी एक वर्षापासून तयारी केली होती. रोजच्या सरावाबरोबर 'अप हिल' व 'डाऊन हिल' असे प्रकार ते करीत होते. दररोज ठराविक अंतर तर रविवारी लॉँग रनचा सराव त्यांनी केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Durban Comrade Marathon
Inspirational News : पिंपळगावच्या सुषमाताई बनल्या महिला सक्षमीकरणाच्या दूत

भारतात फूल मॅरेथॉन ही ४२ किलोमीटरची असते; मात्र, ही स्पर्धा ८९ किलोमीटरची असल्याने खेळाडूंचा कस लागतो. या स्पर्धेच्या पात्रतेसाठी तीन सराव वर्ग करणे बंधनकारक असते. यातील दोन सराव वर्ग भारतातील लोणावळा व एक सराव वर्ग लवासा येथे आयोजित करण्यात आला.

ज्यांनी ही प्रशिक्षण पूर्ण केले अशाच व्यक्तींना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. ही स्पर्धा पूर्ण करण्याचे प्रत्येक रनरचे स्वप्न असते. स्पर्धे दरम्यान धावताना रस्त्याच्या दुतर्फा लोक प्रोत्साहन करायला उभे होते त्यांनी आपल्या भारत देशाबद्दल घोषणा दिल्यामुळे धावपटूंना एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

"पहिल्यांदाच नाशिकमधील सात स्पर्धक यात सहभागी झाले. अत्यंत कठोर श्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण सर्वांनी पूर्ण केली. जास्ती जास्त स्पर्धकांनी यास्पर्धेत सहभागी व्हावे."

- महेंद्र छोरीया, धावपटू

Durban Comrade Marathon
NDVS Bank Election : व्यापारी बॅंक निवडणुकीत सहकार पॅनलची सत्ता! समर्थकांचा जल्लोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.