Nashik News : पूर नियंत्रण कक्षाचे दिवसरात्र काम सुरू! जलसाठ्याची माहिती संकलित

Nashik News : यंदा मॉन्सून नाशिकमध्ये उशिरा दाखल झाला. गेल्या तीन चार दिवसात विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे.
Sandesh Poonam Patil and Amit Deshmankar, employees of the Water Resources Department, in the flood control room.
Sandesh Poonam Patil and Amit Deshmankar, employees of the Water Resources Department, in the flood control room.esakal
Updated on

Nashik News : यंदा मॉन्सून नाशिकमध्ये उशिरा दाखल झाला. गेल्या तीन चार दिवसात विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. मॉन्सून कालावधीत जलसंपदा विभागातर्फे पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला जातो. या माध्यमातून जलसाठ्याची स्थिती नियमित संबंधित विभागांना कळविली जाते. (Flood control room work day and night Collected information on water resources)

२४ तास सुरू असणारा हा कक्ष तीन- चार दिवसापासून पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे अधिक सक्रिय झाला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर कालावधीत सलग २४ तास धरणांमधील पाण्याची स्थिती, आवक, विसर्ग याबद्दलची निरीक्षणे नोंदवून निरनिराळ्या विभागांना माहिती कळविण्यात येते. सकाळी सहा ते दोन दुपारी, दोन ते दहा रात्री दहा ते सकाळी सहा या शिफ्टमध्ये संपूर्ण दिवसरात्र काम सुरू असते.

एकूण ७ तंत्रज्ञ व संदेशक २४ तास पूर नियंत्रण कक्षेच्या कक्षात कार्यरत आहे. मॉन्सून उशिरा दाखल झाला तरी मात्र पूर नियंत्रण कक्ष हा ठरलेल्या तारखेला सुरू झाला. जिल्ह्यातील भागात झालेल्या पावसाची स्थिती, त्यामधून धरण क्षेत्रात एकूण किती पाणी आले आहे, त्याची पाणी पातळी, सांडवा, विसर्ग एकूण पर्जन्य, कालवे विसर्ग.

पाणी वापर अशी विविध माहिती संकलित करून सकाळी विविध विभागांना पाठविले जाते. जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, मंत्रालय, जलसंपदा महामंडळ छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी माहिती पाठवली जाते. तसेच धरणातून विसर्ग केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालय.

Sandesh Poonam Patil and Amit Deshmankar, employees of the Water Resources Department, in the flood control room.
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

नाशिक पोलिस आयुक्तालय व ग्रामीण यांना वेळोवेळी किती प्रमाणात विसर्ग झालेला आहे, धरणातून सोडलेला विसर्ग बरोबरच अतिवृष्टी ढगफुटी, धरणफुटी या अशा घटनांबद्दलही निरीक्षणे अत्यंत बारकाईने नोंदविले जातात. याबद्दलची माहिती दिली जाते. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व जीवितहानी होऊ नये म्हणून कळविले जाते.

"पूर नियंत्रण कक्षात सर्व पाण्याच्या साठ्याबद्दलची इत्थंभूत माहिती संकलित करून विविध विभागांना पाठविले जाते. जलसंपदा विभागाचे ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची तेथे नियुक्ती केलेली आहे .त्यांना नेमून दिलेल्या वेळेत तेथे उपस्थित राहणं बंधनकारक आहे." - सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Sandesh Poonam Patil and Amit Deshmankar, employees of the Water Resources Department, in the flood control room.
Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.