Nashik Godavari Flood News : शहर परिसरासह गंगापूर धरण क्षेत्रात संततधार पावसामुळे सोमेश्वर धबधबा खळखळून वाहू लागला असून गोदाघाटावरील मंदिरा पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर, पुराच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून पुराच्या पाण्यात उतरून धोकादायकरित्या सेल्फी काढत आहेत.
मात्र सोमेश्वर येथे करण्यात आलेले बॅरिकेटींग तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर गोदाघाटावर पोलीस असले तरी ते बघ्याच्याच भूमिकेत दिसून आले. दरम्यान, रविवारी (ता. ४) दुपारी पुराच्या पाण्यात तरुण अभियंता वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Flood tourism on Someshwar Godaghat)
गंगापूर धरणातून रविवार (ता. ४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर, शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे गोदावरी नदी पात्राच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे.
यामुळे सोमेश्वर येथे खळाळणारा धबधबा आणि पाण्याचे रौद्ररुप पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. याठिकाणी धोकादायकरित्या धबधब्याजवळ जाणार्या पर्यटकांना अटकाव करण्यासाठी नव्याने बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार असे ९ पोलीसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त याठिकाणी आहे. (latest marathi news)
गोदाघाटावर गर्दी
तब्बल दोन वर्षांनी गोदावरी नदीला पावसाळ्यात यंदा पहिला पुर आला आहे. गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. तसेच, सकाळपासून गोदाघाट पाण्याखाली गेला. तर दुपारनंतर काही मंदिरेही पाण्याखाली गेली.
रविवारी दुपारीच तरुण अभियंता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरीही पर्यटकांची गर्दी हटत नव्हती. काही पर्यटक थेट पुराच्या पाण्यात उतरून मोबाईलमध्ये सेल्फी काढत होते. याठिकाणीही पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता, परंतु तेही बघ्याच्या भूमिकेत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.