Nashik Rain: भोजापूर अन देव नदीच्या पूर पाण्याने सिन्नरच्या पूर्व भागाला संजीवनी! जामनदी प्रवाहित झाल्याने पाणीटंचाईचे संकट टळले

Latest Heavy Rain News : त्यामुळे पूर्व भागातील मोठी असलेली जाम नदी पावसाळ्याच्या सरतेशेवटी प्रवाहित होऊन पाणीटंचाईचे संकट टळले आहे.
Flood water
Flood wateresakal
Updated on

सिन्नर : पावसाने हुलकावणी दिल्यानंतर सिन्नरच्या पूर्व भागातील बळीराजाचा जीव टांगणीला लागला होता. मात्र परतीचा पाऊस देवनदी आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या पाणलोटात बरसले. त्यामुळे भोजापुर धरणाचे पूर पाणी जाम नदीला येऊन मिळाले. सोबतीला देव नदीचे पाणी देखील कुंदेवाडी-सायाळे आणि खोपडी-मिरगाव या बंदिस्त पुरचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्व भागात खेळले. त्यामुळे पूर्व भागातील मोठी असलेली जाम नदी पावसाळ्याच्या सरतेशेवटी प्रवाहित होऊन पाणीटंचाईचे संकट टळले आहे. (flood water of Bhojapur Dev river revived eastern part of Sinnar)

गेल्या दोन वर्षांपासून सिन्नर तालुक्याचा पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे. दोन्ही वर्ष जेमतेम पाऊस पडल्यामुळे सर्वच नदी नाले बंधारे कोरडे टाक पडले होते. यंदाचा पावसाळा देखील सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लावणारा ठरला. पावसाळा परतीला असताना सरतेशेवटी भोजापूर धरणाचे आणि देव नदीचे पूर पाणी पूर्व भागाची गरज भागवण्यासाठी मदतीला आले.

भोजापुरच्या पूर पाण्याच्या आवर्तनाचा लाभ नांदूर शिंगोटे पासून जाम नदीला मिळाला. त्यामुळे प्रवाहित झालेली जाम नदी आपल्या मार्गातील सर्व बंधारे भरून घेत मीठसागरेपर्यंत पोहोचली. कनकोरी, मानोरी, मरळ, सुरेगाव, पांगरी, मीठसागरे दरम्यान सुरेगाव शिवारात देव नदीचे पूरपाणी देखील जाम नदीला मिळाले.

त्याचा दुहेरी फायदा होऊन पाणी थेट पिंपरवाडी शिवारात पोहोचले. तर खोपडी ते मिरगाव पूर चारीतून देव नदीच्या पाण्याने महिन्यापूर्वीच पंचाळे, पुतळेवाडी, शहा, पिंपरवाडी, मिरगाव परिसराची गरज पूर्ण केली होती. आता जाम नदी पूर्णपणे प्रवाहीत झाली असल्याने पूर्व भागातील मोठा भाग पाणीटंचाईच्या संकटातून वाचला आहे. (latest marathi news)

Flood water
Jalgaon Heavy Rain : जिल्ह्यात परतीच्या पावसाने 4 हजार हेक्टरवर नुकसान! कापूस सर्वाधिक प्रभावित; शेतकरी हवालदील

पांगरी येथील पाणीपुरवठा योजना मनेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या शेवटच्या टोकाला येते. मात्र अपवादानेच योजनेचा लाभ पांगरीकरांना मिळतो. मधल्या काळात पंचाळे शिवारातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, ती देखील रडतखडत सुरू आहे.

त्यामुळे पांगरीकरांना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जाम नदी प्रवाहित होऊन पांगरी शिवारातील सर्वच बंधारे काठोकाठ भरले आहेत. पांगरी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीचा प्रश्न मार्गी लागला असून परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनासाठी पर्यायाने दुग्ध व्यवसायास देखील फायदा होणार आहे.

Flood water
Nashik Heavy Rain: निफाडच्या उत्तरपट्यात पावसाचा रुद्रावतार! उगावला 30 कुटुंबाच्या घरात पाणी, शिवडीला 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.