Teachers Recruitment : ‘शिक्षक’ भरतीत आरक्षणाचे पालन करा; पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांसाठी सूचना जारी

Nashik News : स्‍थानिक निवड समितीद्वारे तदर्थ स्वरूपात शिक्षकी पदे भरण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सूचना जारी केली आहे.
Teachers Recruitment
Teachers Recruitmentesakal
Updated on

Nashik News : स्‍थानिक निवड समितीद्वारे तदर्थ स्वरूपात शिक्षकी पदे भरण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सूचना जारी केली आहे. शासनाने निर्गमित केलेल्‍या आरक्षण धोरणानुसार आरक्षण निश्‍चिती करताना व विद्यापीठाच्‍या आरक्षण कक्षाकडून पडताळणी करून घेतल्‍यानंतर जाहिरातीची प्रक्रिया राबविण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

पुणे विद्यापीठाशी संलग्‍न सर्व महाविद्यालये व परिसंस्‍थांना यासंदर्भात सूचना दिल्‍या आहेत. स्‍थानिक निवड समितीद्वारे पूर्णवेळ तदर्थ स्‍वरूपातील शिक्षकी पदे भरताना आरक्षणासंदर्भातील प्रपत्रामध्ये संस्‍थेचे अध्यक्ष किंवा सचिन यांच्या सही-शिक्‍यानिशी तयार करून आरक्षण कक्षामध्ये पडताळणीसाठी संस्‍थेच्‍या लेटरहेडवर आरक्षणाची मागणी नमूद करून सादर करण्यास सांगितले आहे.

तसेच संस्‍था प्रमुखांनी नामनिर्देशित केलेल्‍या आरक्षित प्रवर्गातील आरक्षण प्रतिनिधीचा स्‍थानिक निवड समितीमध्ये समावेश करून मुलाखतींचे आयोजन करण्याबाबतही सुचविले आहे. (latest marathi news)

Teachers Recruitment
Nashik News : ‘इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब’ची जागा परत करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची ‘सीपीआरआय’ला सूचना

३० सप्‍टेंबरपर्यंत मुदत

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तदर्थ स्वरूपातील किंवा तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नेमणूक करण्यासाठी १५ ते ३० जून या कालावधीत स्‍थानिक निवड समितीचे आयोजन करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. निवड समितीचे आयेाजन केल्‍याच्‍या ४८ तासांच्‍या आत निवड समिती अहवाल ऑनलाइन पद्धतीने अपलोड करावा व मूळ निवड समिती अहवाल ७२ तासांच्‍या आत कार्यालयाकडे सादर करण्यास सांगितले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मान्‍यता दिलेल्‍या शिक्षकांना मुदतवाढीचे प्रस्‍ताव संस्‍थेच्‍या ठरावासह नेमणूक आदेश, रुजू अहवाल, शैक्षणिक आर्हता व इतर आवश्‍यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यासाठी १५ जून ते ३१ ऑगस्‍ट अशी मुदत दिली आहे.

Teachers Recruitment
Nashik Monsoon News : पावसाच्या माहेरघरी मॉन्सूनची प्रतीक्षा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.