Nashik Food Culture : नाशिकच्या खाद्यसंस्कृतीला मिसळीचा तवंग; खवय्यांची गर्दीची साक्ष

Misal Pav News
Misal Pav Newsesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्रातील काही शहरांची ओळखच तेथील खाद्यपदार्थांवरून निर्माण झाली आहे. कोल्हापूर म्हटले, की तेथील तांबडा अन्‌ पांढरा रस्सा, मुंबई म्हटली की तेथील तो वडापाव, खानदेश म्हणजे वांग्याचे भरीत, पुरणाचे मांडे.

तसेच, नाशिकचे नाव समोर आले की चटकन आठवते ती काळी, हिरवी, लाल मिसळ. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही, अशी विविध प्रकारातील मिसळ खवय्यांची भूक भागविते.

आध्यात्मिक, पौराणिक असलेल्या या शहरातील मिसळीचे ब्रॅण्ड तयार झालेल्या हॉटेल्सपासून तर रस्त्यालगतच्या हातगाड्यांवर मिसळ खवय्यांची गर्दीच पाहून ती नाशिकची मुख्य खाद्यसंस्कृतीच झाली आहे. (Nashik food culture is Misal Testimony of gourmet crowd One or more varieties available Nashik News)

Misal Pav News
Healthy Food : तांदुळ, रव्याची इडली खाऊन कंटाळलात? आता बनवा गाजराची पौष्टीक इडली!

नाशिक वगळता राज्यात अन्यत्र कुठेही मिसळ पाव हा पदार्थ हॉटेलमध्ये मिळतो. परंतु, त्यामध्ये मोड आलेली मिसळ शोधूनही सापडत नाही, हेही वास्तव आहे. बहुतांश ठिकाणी मिसळऐवजी फरसाण आणि पोहे यांचा वापर केला जातो. नाशिकमध्ये मात्र मोड आलेल्या मटकीपासून तयार करण्यात आलेली मिसळच मिळते.

मिसळ खवय्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी विविध प्रकारची मिसळ बनविण्याची कला आत्मसात करून तिचा ब्रॅण्ड तयार केला. काळ्या मसाल्यापासून बनविण्यात येणारी मिसळ, लाल मसाल्याची मिसळ, हिरवी मिसळ असे एक ना अनेक प्रकार मिसळीचे नाशिकमध्ये पहावयास मिळतात. विशेषत: मिसळ नावाने ब्रॅण्ड तयार झालेल्या हॉटेल्समध्ये अक्षरश: खवय्यांची गर्दी असते.

अलीकडे तर पेरू, केळी, द्राक्षांच्या बागांमध्ये मिसळपावचा व्यवसाय थाटला आहे. त्या ठिकाणी विकएंडला खवय्यांची तोबा गर्दी असते. याशिवायही, रस्त्यालगत, चौकाचौकात गाड्यावरची मिसळ खाण्यासाठीही गर्दी दिसते.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Misal Pav News
Sea Food: वाढत्या थंडीमुळे मासळीची बाजारपेठ तेजीत; खवय्यांच्या खिशाला भार

मिसळ पौष्टिकही

मोड आलेले कडधान्य हे शरीरासाठी अत्यावश्‍यक असतात. मोड आलेल्या कडधान्यामुळे प्रोटिन्स आणि लोह मिळते. मोडीच्या मटकी मिसळमध्ये सर्वाधिक असते. त्यामुळे मिसळीतून फायबरही मिळते. मिसळ ही शरीरासाठी पौष्टिक मानली जाते.

खाद्यसंस्कृतीत सर्वसमावेशकता

नाशिक शहरात राज्यातील विविध प्रदेशातून आलेले रहिवासी आहेत. सिडको परिसरात बहुसंख्येने खानदेश परिसरातील नागरिकांचा रहिवास आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी खानदेश महोत्सव भरविला जातो.

या महोत्सवात मोठ्या प्रमाणात पुरणाचे मांडे आणि वांग्याचे भरीत आकर्षण ठरते. गेल्या काही वर्षांपासून हे पदार्थ नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा पदार्थ झाले आहेत. त्याचप्रमाणे, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात दाळबट्टी हा प्रसिद्ध खाद्यप्रकार आहे. नाशिकमध्येही दाळबट्टीच्या पंगती उठतात. हाही पदार्थ नाशिककरांच्या आवडीचा झाला आहे.

Misal Pav News
Food Tricks : राजमा चावल खायचाय, पण राजमा भिजवायचा विसरलात? हि सोप्पी ट्रिक करेल मदत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.