नाशिक : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रांमुळे २०१९ पासून शहरी भागात अन्न वाया जाण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. कणीक मळण्यापासून ते पुरी, पोळी, फुलके, शेव, फाफडा बनविण्याचे मशिन, रबडी घोटण्याचे मशिन यांमुळे तासाभरात आठशे माणसांचा स्वयंपाक तयार होत आहे. यामुळे अतिथींच्या संख्येनुसार ताजे जेवण बनविले जाते. अत्याधुनिक यंत्रांमुळे पूर्वापार चालत आलेल्या समस्या कमी झाल्या आहेत. (Food wastage reduces cooking for 800 people in hour thanks to modern machines )
पूर्वी येणाऱ्या अतिथींचा अंदाज बघून हजार लोकांचा स्वयंपाक मोठ्या पातेल्यात बनविला जायचा. त्यानंतर जेवणावळ बसायची. यातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. प्रत्येकवेळी स्वयंपाकाचे गणित बरोबर येईलच, असे होत नाही. परंतु, आता ही पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे. आता कार्यक्रमांमध्ये ‘लाइव्ह’ सिस्टीमनुसार स्वयंपाक बनविला जातो. त्यासाठी खास व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. तो परिस्थिती बघून अन्न किती लागणार याचे नियोजन करतो.
स्वयंपाकाची पूर्वतयारी केलेली असते. तीन तासांची जेवणावळ असेल तर एकावेळी अर्ध्या तासात १०० लोक जेवण करतात. त्याप्रमाणे पदार्थ बनविले जातात आणि स्वयंपाक कमी-जास्त होत नाही. सर्व काही ‘सिस्टीमेटिक’ केले जाते. हजार पाहुण्यांच्या स्वयंपाकाची ऑर्डर असताना सातशे पाहुणे आले तरी उरलेले स्वयंपाकातील (कच्चा माल) भाजीपाला, पनीर, फळ, दुग्धजन्य पदार्थ फ्रिज व वेयर हाउसमध्ये साठवून ठेवले जातात आणि त्याचा उपयोग दुसऱ्या समारंभात केला जातो. (latest marathi news)
उरलेले अन्न कंटेनरमध्ये
हॉटेलमध्ये तसेच समारंभात अन्न वाया जाऊ नये यासाठी उरलेले अन्न कंटेनरमध्ये पॅक करून दिले जाते. हॉटेलमध्ये एक भाजी ऑर्डर केल्यानंतर ती दोन व्यक्तींना पुरून उरत असेल तर ती वाया न जाता हॉटेल व्यावसायिक ती भाजी कंटेनरमध्ये पॅक करून देतात. या पद्धतीमुळे अन्न वाया जाण्याची शक्यता राहत नाही. पूर्वी महिला पोळ्या लाटण्याचे काम करायच्या त्यात, नजरचुकीने केस आढळल्यास समारंभात गोंधळ उडायचा. परंतु आता यंत्रांमुळे स्वयंपाकासाठीचे मनुष्यबळ कमी झाल्याने सर्व काम यंत्र तर त्यांना हाताळण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासते.
''पूर्वीसारखी अन्न वाया जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक यंत्र उपलब्ध आहेत. केटरिंग असोसिएशनच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रबोधनपर फलक लावले जातात. तसेच उष्टे अन्न ठेवणाऱ्यांकडून दंड घेतला जातो. लोकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते की, भविष्यात अन्न उष्टे ठेवणार नाही. प्रत्येक समारंभात हा उपक्रम राबविला जातो.''- उत्तम गाढवे, अध्यक्ष, केटरिंग असोसिएशन, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.