SAKAL Impact : ‘जलजीवन’ च्या बिलांसाठी 17 कोटींचा निधी प्राप्त!

Nashik News : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १ हजार २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.
SAKAL Impact
SAKAL Impact esakal
Updated on

Nashik News : जिल्हयात जलजीवन मिशन अतंर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण वेळात पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असताना केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी तीन महिन्यांपासून निधी नसल्याचे वास्तव ‘सकाळ’ ने निर्देशनास आणले होते. (For bills of Jal Jeevan Funding of 17 crore received)

यावृत्तीची शासन स्तरावर दखल घेण्यात आले असून बिले अदा करण्यासाठी १७ कोटींचा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत १ हजार २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यातील आतापर्यंत ७६३ कामे पूर्ण असून ४५९ योजनांची कामे प्रगतीत आहे.

तर, ३१ जुलै अखेर ८२० योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे. या योजनांसाठी आतापर्यंत ७०८ कोटींचा निधी खर्च झाला आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ ची डेडलाईन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने निश्चित केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्यापूर्वी योजना पूर्ण करण्यासाठी ३० ते ३५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.

यातून मार्च अखेरीस बहुतांश बिले अदा झालेली आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण होत असल्या तरी, योजनांच्या झालेल्या कामांची बिले देण्यासाठी विभागाकडे तीन महिन्यांपासून निधी नसल्याने कामांची बिले निघालेली नव्हती. तीन महिन्यांपासून निधीच प्राप्त झालेला नसल्याने १५ कोटींची बिले थकलेली आहे. (latest marathi news)

SAKAL Impact
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

यासाठी विभागाने शासनाकडे २३० कोटींची मागणी केली आहे. कामांना बिले नसल्याचे वास्तव मांडल्यानंतर केंद्र शासनाने आपल्या हिस्साचा निधीचे वितरित केला आहे. त्यानुसार १७ कोटींचा प्राप्त झाला आहे.

"जलजीवन मिशन अतंर्गत सुरू असलेल्या योजनांच्या कामांसाठी १७ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. यातून टप्पाटप्याने बिले अदा केली जातील. राज्य शासनाकडूनही तत्काळ निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे." - संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प

SAKAL Impact
Nashik News : 7 वर्षांपासून बागवानी संशोधन केंद्राला संचालक नाही; नाशिक केंद्र विजनवासात कारभार दिल्लीच्या हाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.