Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा अंतिम होत असला तरी शहरातील २४० किलोमीटर रस्त्यांची कामे होणार आहेत. यातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना देत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळा कालावधीत पाच कोटी भाविक नाशिकला येण्याची शक्यता गृहित धरुन हे सर्व नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Simhastha Kumbh Mela)
सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक सोमवारी (ता.८) विभागीय आयुक्तालयात पार पडली. यावेळी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी नाशिक महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावात कामे तत्काळ करणे आवश्यक आहे, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच कामांसाठी निधी उपलब्ध होणे शक्य नाही.
अजून सिंहस्थासाठी तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे महापालिकेने विभागनिहाय जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. निधीच्या उपलब्धतेनुसार काही कामे पुढे घेऊन जाता येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थासाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत.
त्यासाठी पुरेसा वेळ हातात असला तरी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. आराखडा तयार करताना शासकीय नियम आणि स्थानिक परिस्थिती यांचा विचार करून विकासकामांवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक विभागाची बैठक घेऊन त्यांच्या नियोजनाची माहिती घेतली जाईल. या नियोजनात निधी कमी जास्त ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (latest marathi news)
सिंहस्थासाठी नाशिकमध्ये येणारे भाविक पर्यटन म्हणून परिसरातील स्थानांना भेट देतील, त्या ठिकाणांचाही विकास करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. ज्या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही त्या ठिकाणी पैसा वाया घालण्याची गरज नाही. केवळ सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करून त्या ठिकाणांचा विकास करण्याचा विचार करावा. ज्या ठिकाणी पदपथ नाही त्या ठिकाणी पदपथ उभारावेत जेणे करून पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल.
साधुग्रामचा विषय शासन स्तरावरचा
साधुग्रामसाठी जमिनींची अधिग्रहण करणे किंवा दोन वर्षांसाठी जमिनी भाडेतत्त्वावर घेणे असे दोनच पर्याय प्रशासनापुढे उपलब्ध आहेत. परंतु, हे विषय शासन स्तरावरचे असल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले. याबाबत उपलब्ध वेगवेगळ्या पर्यायांचा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. त्यावर सविस्तर चर्चा करावी, असेही गेडाम यांनी सांगितले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- मागील सिंहस्थामध्ये शहरात सहाशे सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा
- स्मार्ट सिटीसह महापालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार
- नाशिकमध्ये फाळके स्मारक, बॉटनिकल गार्डन, कुसुमाग्रज स्मारकांचे जतन व संवर्धन
- महापालिकेमध्ये स्थापत्य अभियंत्यांची भरती करण्याच्यादृष्टीने विचार
- रामतीर्थ आणि गोदावरी नदी सिंहस्थाच्यादृष्टीने महत्त्वाचे, त्यांचे प्रदूषण होवू देणार नाही
- हेरून येणाऱ्या वाहनांना शहरात न येता रिंग रोडनेच परत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारली जाईल
- महापालिकेसह एमएमआरडी यांच्याशी चर्चा
- भाविक पर्यटन म्हणून परिसरातील स्थानांना भेट देतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.