Nashik News : ‘मिसिंग लिंक’वर जंगल क्षेत्र घोषित; मखमलाबाद, गंगापूर रोडला जोडणारा भाग बाधित

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या ४२ हेक्टर जागेवर अचानक जंगल क्षेत्र म्हणून उल्लेख कागदपत्रे असल्याने या भागातील नागरिक गोंधळात सापडले आहे.
Farmers of Makhmalabad while submitting a statement demanding that the Municipal Corporation register objections to the declaration of forest area on the missing link.
Farmers of Makhmalabad while submitting a statement demanding that the Municipal Corporation register objections to the declaration of forest area on the missing link.esakal
Updated on

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या ४२ हेक्टर जागेवर अचानक जंगल क्षेत्र म्हणून उल्लेख कागदपत्रे असल्याने या भागातील नागरिक गोंधळात सापडले आहे. (Forest area declared on missing link section connecting Makhmalabad Gangapur Road is affected)

महापालिकेकडून सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मिसिंग लिंक तयार करताना बापू पुलापासून पुढे जंगल क्षेत्र असा उल्लेख कागदोपत्री आल्याने मखमलाबादला जोडणारा तीस मीटर रस्ता अडचणीत आला आहे व महापालिकेकडून जवळपास १८ कोटी रुपये खर्च करून तयार केला जाणारा गोदावरी नदीवरील पूल देखील बिनकामाचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे महापालिकेकडे यासंदर्भातील नोंद नसल्याने सरकारी कामकाजातील गोंधळ येथील या निमित्ताने समोर आला आहे. २०१७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी कुंभमेळा विकास आराखड्यामध्ये अत्यावश्यक कामांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने मिसिंग लिंक मुख्य रस्त्यांना तसेच नदीवरील पुलांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शिवारातून महापालिकेने बापू पुलाला समांतर जवळपास १८ कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. (latest marathi news)

Farmers of Makhmalabad while submitting a statement demanding that the Municipal Corporation register objections to the declaration of forest area on the missing link.
Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

सुरवातीपासूनच वादग्रस्त असलेल्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पुलापासून पुढे म्हणजे मखमलाबाद शिवारात सर्वे क्रमांक १३२/२ चे ५.८९ हेक्टर क्षेत्रफळ, १५३/१ चे ५.८५ हेक्टर क्षेत्रफळ, १५३/२ चे ६.३३, १५५/१ चे २४.२८ असे एकूण ४२.३५ हे क्षेत्र महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत क्षेत्रफळातून मखमलाबादला जोडणारा ३० मीटर रुंदीचा रस्ता आहे.

भविष्यात पूल सुरू झाल्यास गंगापूर रोड ते मखमलाबाद असा थेट संपर्क या रस्त्याच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर हा भाग विकसित होण्यासदेखील मदत होणार आहे, मात्र मात्र महसूल विभागाने जाहीरनामा प्रसिद्ध करताना वनक्षेत्र दर्शविल्याने या जागेवर वन विभागाच्या परवानगीशिवाय काहीच काम करता येणार नाही. त्यामुळे मखमलाबाद परिसरातील नागरिकांनी एकत्र येत विरोध केला आहे.

Farmers of Makhmalabad while submitting a statement demanding that the Municipal Corporation register objections to the declaration of forest area on the missing link.
Nashik Onion News : नाफेड, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत व्यापारी मालामाल; खरेदीप्रक्रियेत सुचवला बदल

दहा वर्षांपूर्वी महापालिकेचा विकास आराखडा जाहीर झाला आहे. या क्षेत्रातून ३० मीटर रुंदीचा व १८ मीटर रुंदीचा असे दोन रस्ते दर्शविण्यात आले आहे. दोन्ही रस्ते शहराच्या मुख्य दोन भागांना जोडणारे आहे. या रस्त्यांमुळे शहरातील दळणवळण सुविधा सुधारणार असून, सातपूर, महात्मानगर व पश्चिम विभागातील उत्तरेकडचा भाग जोडला जाणार आहे.

त्यामुळे या रस्त्यावर राखीव जंगल रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली वन जमाबंदी अधिकाऱ्यांना आक्षेपाचे पत्र पाठवून महापालिकेने वनक्षेत्रातून जाणारे नियोजित रस्ते राखीव जंगलामधूनच वगळण्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संजय फडोळ, प्रताप काकड, नर्मदा काकड, सुभाष मानकर, भगवान बोंबले, नितीन काकड, सतीश तांदळे, विलास साळवे, ज्ञानेश्वर पिंगळे, सुनीता पिंगळे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

Farmers of Makhmalabad while submitting a statement demanding that the Municipal Corporation register objections to the declaration of forest area on the missing link.
Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.