Nashik News : अंजनेरी गडाभोवती वन विभागाचे पर्यटकांसाठी सुरक्षाकवच

Nashik : पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेक अपघात घडतात.
The arrangements of the forest department have been deployed to prevent any untoward incident in tourism.
The arrangements of the forest department have been deployed to prevent any untoward incident in tourism.esakal
Updated on

Nashik News : पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेक अपघात घडतात. यासाठी वन विभागाने वीकेंडच्या निमित्ताने अंजनेरी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी व गडरक्षक तैनात केले होते. गेल्या रविवारी अंजनेरी डोंगरावर २५० हून अधिक पर्यटक अतिपावसामुळे अडकून पडले होते. वन विभागाचे कर्मचारी व गडरक्षक यांनी मानवी साखळीद्वारे त्यांना सुखरूप पायथ्याशी आणले. (Forest Department security for tourists around Anjaneri Fort)

सकाळी अकराला वर अडकलेले पर्यटकांना खाली आणण्यासाठी सायंकाळ झाली होती. सर्व पर्यटकांना सुखरूप खाली आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत झाली. त्यामुळे वन विभागाने या वेळी अधिक खबरदारी घेत एकप्रकारे सुरक्षाकवच निर्माण केले आहे. वन विभागातर्फे अंजनेरी डोंगर परिसरामध्ये जर पाऊस वाढला तर पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. (latest marathi news)

The arrangements of the forest department have been deployed to prevent any untoward incident in tourism.
Nashik News : नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपावर फुली! राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार भरती

त्याचबरोबर वातावरणाचा अंदाज घेऊन त्यानुसारच पर्यटकांना गडावर सोडले जाते. दुपारी चारनंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये पर्यटकांना डोंगरावर जाऊ दिले जात नाही. तशी काही परिस्थिती उद्‍भवल्यास पोलिस प्रशासनाशीही समन्वय साधून संपूर्ण वेळ वन विभागाचे कर्मचारी अंजनेरी डोंगर परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत.

''वातावरणाचा अंदाज घेऊनच पर्यटन करताना अतिपाऊस असेल तर काही मर्यादेपर्यंतच पर्यटनस्थळावर जावे. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याशी हुज्जत घालू नये. आपण व आपल्या परिवाराची काळजी घेत पर्यटनाचा आनंद घ्यावा.''- वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी

The arrangements of the forest department have been deployed to prevent any untoward incident in tourism.
Nashik News : पहिने येथे ग्रामीण पोलिसांकडून दणका; मद्यपी, हुल्लडबाजांविरोधात चोख नाकाबंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.