अंबासन, (जि.नाशिक) : उन्हाची लाहीलाही वाढू लागताच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. यामुळे बहुतांश ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियोजन आखले जात आहे. दरम्यान माणसाप्रमाणेच वन्य जिवांनाही जंगलात पाण्यासाठी वणवण भटकंती होऊ नये यासाठी ताहराबाद वनपरिक्षेत्र व लोकसहभागातून जंगलात ठिकठिकाणी वाॅटरहोल निर्माण केले असून यात टॅकरव्दारे पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आहे. यामुळे वन्यजीवासह हिंस्र प्राण्यांची पाण्याची सोय होणार आहे. (Nashik Forest waterholes provide water to wild animals ambasan marathi news)
उन्हाची चाहुल लागताच शेतीशिवारातील विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली आहे. बहुतांश शेतकरी पाण्याअभावी शेतातील पिके वाचविण्यात अपयशी ठरत असल्याने मेंढपाळांना चराईसाठी सोडून दिल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही तळ गाठू लागल्याने एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान जंगलातील वन्यजीवांनाही या भीषण पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असल्याने ताहारबाद वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणेसह वनपाल विनायक देवरे, विशाल दुसाणे, तुषार देसाई, सागर पाटिल, गौरव आहिरे, वनकर्मचारी आकाश कोळी, संदिप गायकवाड, सुनिता बहिरम, ज्ञानेश्वर सोनवणे, महेंद्र भदाणे, विकास मोरे, निलेश कोळी, माणिक मोरे, दादाभाऊ सोनवणे, रेणूका आहिरे, किसन आहिरेसह नागरिकांनी लोकसहभागातून जंगलात ठिकठिकाणी वन्यप्राण्यासाठी वाॅटरहोल निर्माण केले आहेत. (Latest Marathi News)
तीव्र उन्हाची चाहुल तसेच पाण्यासाठी हिंस्र प्राणी गावकुसाबाहेर फिरकू नये यासाठी तयार केलेल्या वाॅटरहोलमध्ये टॅकरव्दारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे जंगली वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती दुर होणार आहे.
ताहराबाद वनक्षेत्र : २६५३९, २२५ (हेक्टर),
नियतक्षेत्र संख्या : १२,
परिमंडळ संख्या : ४
या भागातील जंगलात वाॅटरहोल : वडेखुर्द, अंबासन, वरचे टेंभे, चिराई, बिलपुरी, बोढरी व बहीराणे.
"उन्हाळ्यात जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर जंगली प्राण्यांची तहान भागविण्यासाठी आम्ही व नागरिकांनी लोकसहभागातून ठिकठिकाणी जंगलात वाॅटरहोल निर्माण केले आहेत. या वाॅटरहोलमध्ये टॅकरव्दारे पाणीपुरवठा करीत आहोत यामुळेच वन्यप्राण्याची तहान भागविण्यात मदत होणार आहे."- शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र आधिकारी ताहराबाद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.