Nashik News : 'माकपा'ला दिंडोरीची जागा 'इंडिया'ने सोडावी : माजी आमदार गावित

Nashik : भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी एकोप्‍याने निवडणूक लढावी लागणार आहे.
cmp
cmpesakal
Updated on

Nashik News : भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी एकोप्‍याने निवडणूक लढावी लागणार आहे. मार्क्सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाची ताकद दिंडोरीसह सोलापूर, पालघर या मतदारसंघात आहे. परंतु इंडिया आघाडीने राज्‍यात दिंडोरीची एकमेव जागा माकपाला सोडावी, अशी भूमिका पक्षाच्‍यावतीने माजी आमदार जे. पी. गावित यांनी पत्रकार परिषदेत मांडली. (Nashik Former MLA Gavit statement of India should give Dindori seat to CMP marathi news )

मागणीवर विचार न झाल्‍यास दिंडोरीसह इतर जागांवर निवडणूक लढविण्यासंदर्भात राष्ट्रीय कार्यकारणीशी चर्चा केली जाईल, असा इशारा त्‍यांनी दिला. पत्रकार परिषदेस डॉ. डी. एल. कराड, ॲड.तानाजी जायभावे, सुनिल मालुसरे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते. यावेळी माजी आमदार गावित म्‍हणाले, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपाचा दबदबा आहे. (latest marathi news)

cmp
Nashik News : बसचालक, वाहकांना आंघोळीसाठी मिळणार गरम पाणी! सरपंच भास्करराव बनकरांकडून वॉटर सोलर भेट

इंडिया आघाडीकडेदेखील काही उमेदवार आहेत. परंतु आम्‍हाला जागा सोडल्‍यास विजय निश्‍चित मिळवू. गृहित धरत गैरफायदा घेण्याचा प्रयत्‍न केला जाऊ नये, अन्‍यथा दिंडोरीसह इतर जागांवर निवडणूक लढविण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचविले जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

डॉ. डी. एल. कराड म्‍हणाले, की नुकत्याच झालेल्‍या ऑनलाइन बैठकीत जे. पी. गावित यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे सूचविण्यात आले. राष्ट्रीय पदाधिकारी सीताराम येच्‍युरी हेदेखील या जागेसाठी आग्रही आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्‍यासोबत चर्चा सुरु आहे. तोडगा न निघाल्‍यास केंद्रीय नेतृत्‍वाशी चर्चा करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

cmp
Nashik News : पेठ रोडला रस्त्याच्या मधोमध कचराफेक! महापालिकेकडून कारवाई करण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.