ZP Gram Sevak News : ग्रामसेवक जिल्हा परिषदेच्या रडारावर; 15 दिवसांत 4 ग्रामसेवक निलंबित!

Nashik News : जिल्ह्यात ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने विविध कारणांनी चार ग्रामसेवकांना निलंबित केले.
Nashik ZP
Nashik ZP esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यात ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने विविध कारणांनी चार ग्रामसेवकांना निलंबित केले. काही महिन्यांपूर्वीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी एका ग्रामसेवकाचे निलंबन झाले होते. तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, निधीचा अपहार. (Four gram sevak suspended in fifteen days)

बेकायदेशीर मद्यविक्री परवाना दिलेल्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झालेली असताना मालेगाव तालुक्यातील वळवाडी, कोठरे बुद्रुक, निमशेवडी येथे कार्यरत ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ९० हजार ५९५ रुपयांचा अपहार तसेच कामकाजात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करत ग्रामपंचायतींनी दणका दिला आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आहेत. निम्म्याहून ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांबाबत तक्रारी असल्याचे बोलले जात आहे. तक्रारी आल्यानंतर त्यांची चौकशी अन् पुढील कार्यवाहीत मोठा कालावधी जातो. यात अनेकदा त्यांची बदली करून त्यांना पाठीशी घातले जाते. मात्र, ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकांबाबत कडक पवित्रा घेतला आहे.

जुलैमध्ये तब्बल चार ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विविध कारणांनी या ग्रामसेवकांबाबत कारवाई प्रस्तावित होती. विभागाने तत्काळ सुनावणी घेत त्यांच्यावर बडतर्फ, निलंबन अशा कारवाया केल्या आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख ५७ हजार ७५० रुपयांच्या अपहार प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांचे ७ जुलैला निलंबन करण्यात आले. (latest marathi news)

Nashik ZP
Nashik Onion News : कांदा ‘महाबँक’ म्हणजे ‘जखम पायाला अन्‌ उपाय शेंडीला’

आरोग्य विभागाकडून दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने नाशिक तालुक्यातील महिरावणीचे ग्रामसेवक सुनील निकम यांचे ११ जुलैला निलंबन करण्यात आले. चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील ग्रामसेवक देवीदास आनंदा पाटील यांना ग्रामसभेत ठराव झालेला नसताना गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना देणे भोवले आहे.

कागदोपत्री ग्रामसभा दाखवून हा परवाना झाल्याचे सिद्ध झाल्याने विभागाने १७ जुलैला पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले, तर २३ जुलैला ९० हजार ५९५ रुपयांचा अपहार तसेच कामकाजात कसूर केल्याप्रकरणी ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांना बडतर्फ करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील वळवाडी.

Nashik ZP
Nashik News : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प; फोर जी पॉस मशीन्सला सर्वर डाऊनचा फटका

कोठरे बुद्रुक, निमशेवडी येथे कार्यरत असताना सूर्यवंशी यांनी हा अपहार केला होता. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करतानाच ९० दिवसांच्या आत त्यांच्याकडून अपहार करण्यात आलेले २० लाख ९० हजार ५९५ रुपये वसूल करावेत; अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे सूर्यवंशी यांच्या आदेशात म्हटले आहे. महिनाभरातील झालेल्या कारवाईने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामसेवकांना दंड

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतींकडून वेळोवेळी आदेश देऊनही ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी न करणेही ग्रामसेवकांना भोवले आहे. जिल्ह्यातील एक हजार ३८८ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ८४ ग्रामपंचायतींनी वेळात दप्तर तपासणी न केल्याने या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना २५ हजारांचा दंड ठोठविण्यात आला आहे. १६ ग्रामपंचायतींवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते.

Nashik ZP
Nashik News : नांदूरमधमेश्वरच्या खालच्या पूलावर स्टंटबाजी! जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यासोबत सेल्फीची धडपड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.