Nashik News: 6 फ्लॅट विकून जमवले साडेचार हजार ऐतिहासिक शस्त्र! नाशिकच्या आनंद ठाकूर यांच्याकडे इतिहासाचा खजिना

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दांडपट्टे, तलवारी, कुऱ्हाडी, वाघनखे, गुप्ती यासारख्या तब्बल साडेचार हजार ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करताना नाशिकच्या आनंद ठाकूर यांना स्वतःचे सहा फ्लॅट विकावे लागले.
Nashikkar seeing the Shivkaline weapon presented at the Mahasanskriti Mahotsav.
Nashikkar seeing the Shivkaline weapon presented at the Mahasanskriti Mahotsav.esakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दांडपट्टे, तलवारी, कुऱ्हाडी, वाघनखे, गुप्ती यासारख्या तब्बल साडेचार हजार ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करताना नाशिकच्या आनंद ठाकूर यांना स्वतःचे सहा फ्लॅट विकावे लागले.

ऐतिहासिक वास्तूचा संग्रहाचा छंद असलेल्या या अवलियाकडे लढाई काळात वापरात आलेल्या दोन तोफांचा संग्रह आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राजघराण्याकडेही संग्रही नसलेली दुर्मिळ कुऱ्हाड, बंदूक ही आनंद ठाकूर यांच्या संग्रहालयात बघायला मिळते. (Nashik treasure trove of Anand Thakur marathi news)

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी देशभर मोघलांचा अंमल होता. त्यांनी वापरलेली शस्त्रे, वजनमापे, दिशादर्शक, मोहोर (शिक्का) आपल्याला आनंद ठाकूर यांच्या श्रीराम शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात बघायला मिळतो. १६ प्रकारच्या शिवकालीन दांडपट्टे, ५५० विविध प्रकारच्या तलवारीचा यात समावेश आहे.

हाताच्या मुठीजवळ गोलाकार असलेली मुघल तलवार व बोटांचे संरक्षण करणारी मराठा तलवार, बंदूक कुऱ्हाड येथे बघायला मिळते. १८४९ मध्ये फ्रेंच इंग्रज अधिकाऱ्यांनी वापरलेली तलवार वजनाने किती हलकी होते, हे दिसून येते. जेजुरी येथील खंडाची प्रतिकृती म्हणून छोटेखानी खांडा, कर्नाटकी फिरंगी यांपासून ते हत्तींना काबूत ठेवण्यासाठी वापरात आलेले अफलातून अंकुश संग्रहालयात दिसून येतो.

कासव, राजस्थानी, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेली ढाल सर्वांना आकर्षित करते. तेगा तलवार हे दुर्मिळ शस्त्रही बघायला मिळते. अशा विविध प्रकारच्या ४५०० ऐतिहासिक वास्तु जमविताना आनंद ठाकूर यांनी देश-देशविदेशाची सफर केली. हा प्रवास करताना त्यांना स्वतःच्या मालकीचे सहा फ्लॅट विकावे लागले.

प्रत्येक वस्तु मिळवताना त्याचे मूल्य द्यावे लागले. या वस्तु मिळवण्यासाठी अपार कष्ट त्यांनी घेतले. नवीन पिढीला आपला इतिहास माहिती हवा. युद्धकाळात सैन्याने वापरलेले शस्त्र कसे होते, त्यांची ओळख राहिली तरच इतिहास जिवंत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहाबाहेर हे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Nashikkar seeing the Shivkaline weapon presented at the Mahasanskriti Mahotsav.
Loksabha Elections: Navneet Rana Amravati मधून, Shrirang Barne Maval मधून कमळावर निवडणूक लढवणार?

दुर्मिळ वस्तूंचा संग्रह

देशभरातील विविध संस्थानिकांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे वजनमाप, शिक्के आदी वस्तु तयार केल्या. या वस्तु म्हणजे त्या संस्थानची ओळख होती. यातील धारचे पवार संस्थानचा बेल्ट कसा होता, हे बघायला मिळते.

तसेच चार किलोचा खंजीर, चाबूक, आदिवासींचे अलंकार, हत्तीच्या पायातील कुलूप, १८०४ मधील मुस्लिम संस्थानची वजनमापे, हस्तिदंत, बच्चा कट्यार, मोठी कट्यार, मोठा अडकित्ता, तोफगोळा, पानाचे डबे, राजघराण्यातील आरसा, काळविटाचे शिंग अशा साडेचार हजार ऐतिहासिक वास्तूचा खजिना नागरिकांना एकाच ठिकाणी बघायला मिळतो आहे.

"त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथे ऐतिहासिक वास्तु संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी जागा मिळवली. पण राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हायला हवे. हा वारसा नवीन पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे. तरच लोक इतिहास आणि ऐतिहासिक घटना स्मरणात ठेवतील."

-आनंद ठाकूर, संचालक, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, नाशिक

Nashikkar seeing the Shivkaline weapon presented at the Mahasanskriti Mahotsav.
CAA कायद्याची पुन्हा चर्चा, Amit Shah यांचा काय आहे प्लॅन ? | BJP | Congress

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()