Nashik Fraud Crime : हातचलाखीने एटीएमची अदलाबदल करून फसवणूक!

Nashik News : दिंडोरी रोडवरील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय वृद्‌धेला मदतीचा बहाणा करून संशयित युवकाने हातचलाखीने एटीएमची बदलाबदल केली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : नाशिकरोड परिसरात दोन दिवसांपूर्वीच घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती झाली आहे. दिंडोरी रोडवरील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय वृद्‌धेला मदतीचा बहाणा करून संशयित युवकाने हातचलाखीने एटीएमची बदलाबदल केली. त्यानंतर त्याने दुसर्या एटीएममधून ३० हजार रुपये काढून घेत गंडा घातला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud by changing ATM with sleight of hand)

शिक्षिका असलेल्या अनुसया निंबा चव्हाण (५५, रा. विनायक नगर, देवधर कॉलेजसमोर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या आकाश पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये संशयित युवक उभा होता.

अनुसया चव्हाण या एटीएमचा वापर करीत असताना संशयिताने मागे उभा राहत नकळत पीन क्रमांक पाहिला. त्यानंतर त्याने पैसे काढून देण्याचा बहाणा केला आणि त्यावेळी हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केली. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Fraud Crime : मयताची 19 लाखांची पॉलिसी ठकबाजाने गंडवली! बनावट कागदपत्राद्वारे विमा कंपनीला लावला चुना

त्यानंतर त्याने दुसरेच एटीएम कार्ड त्यांच्या हातात देत निघून गेला. नंतर संशयिताने पंचवटीतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून अनुसया चव्हाण यांच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी म्हसरुळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक यु.एम. हाके हे तपास करीत आहेत.

Fraud Crime
Pune Crime : पुणे शहरात बलात्काराच्या पाच घटना आल्या उघडकीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.