Nashik Fraud Crime : वडिलोपार्जित शेतजमिनीची वारस नोंद व शेतीचा कब्जा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने आदिवासी शेतकऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातला असून, येथील पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकार असल्याची बतावणी करून तोतया संदीप भिकाजी अवधूत (रा. वणी, ता. दिंडोरी) याने सुभाष सोमा बागूल (वय २८, रा. सुकापूर, ता. कळवण) यांच्याकडून जमिनीचे मूळ कागदपत्रे घेऊन वारस नोंद करून देतो, असे सांगून एक लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची लेखी तक्रार तोतया अवधूत याच्याविरुद्ध अभोणा पोलिसांत दाखल केली होती. ( cheated farmers of lakhs of rupees case has been registered in Abhona police )
या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, आनंदा काळू पवार (रा. वरखेडा, ता. कळवण) यांनादेखील त्या तोतयाने फसविल्याची दुसरी तक्रार दाखल केली होती. शेतजमिनीचा कब्जा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तोतयाने आनंदा पवार यांचा विश्वास संपादन करून ५० हजार रुपये उकळले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ४० हजार रुपये घेतले. असे एकूण ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे.
कळवण, सुरगाणा तालुक्यात तोतया व्यक्तीविरोधात फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अभोणा पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करीत आहेत.
''तोतया व्यक्तीने अजून काही जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.''- यशवंतराव शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अभोणा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.