Nashik Fraud Crime : व्यवस्थापक असल्याचे भासवून भंगार खरेदीदारास 25 लाखांचा गंडा; वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik News : पेपर मिल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे भासवून कंपनीतील भंगार साहित्य विक्रीच्या नावाखाली भंगार व्यावसायिकाकडून २५ लाख रुपयांचा गंडा घालून दोघे संशयित आरोपी फरार झाले आहेत.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : लखमापूर (ता. दिंडोरी) येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोदावरी पेपर मिल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे भासवून कंपनीतील भंगार साहित्य विक्रीच्या नावाखाली भंगार व्यावसायिकाकडून २५ लाख रुपयांचा गंडा घालून दोघे संशयित आरोपी फरार झाले आहेत. (Fraud Crime 25 lakh extorted from scrap buyers by pretending to be a manager)

लखमापूर शिवारातील गोदावरी पेपर मिलची मॅनेजर असल्याचे भासवून हबीबउल्ला सिद्दीकी (रा. अंबड, नाशिक) या भंगार खरेदी करणाऱ्या व्यक्तीस २५ लाख रूपयांचा गंडा घातल्याची तक्रार मोहम्मद रियाज यांनी वणी पोलिस ठाण्यात दिली. गोदावरी पेपर मिलचा मॅनेजर असल्याचे सांगून संजयने (पूर्ण नाव माहित नाही) आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्टर असल्याचे भासवून अंबड येथील भंगार खरेदी करणाऱ्या सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधून पेपर मिलमधील भंगार विक्री करायचे असल्याचे दाखवले.

सदर भंगार ५० लाखाच्या आसपास असल्याचे सांगितले. त्याबाबत चर्चा केली असता ६ जूनला भंगार घ्यायला बोलावले. पेपर मिलमधील भंगार दाखवले. त्यानुसार व्यावहारिक बोलणी करून २५ लाख अ‍ॅडव्हान्स देण्यास सांगितले. संजय व अज्ञात व्यक्तीने सिद्दीकी यांना कार्यालयीन उपयोगात नसलेल्या एका कॅबीनमध्ये बोलावून तेथे रोख स्वरुपात २५ लाख रुपये घेतले. तसेच, माल भरण्यासाठी गाड्या सांगून निघून गेले. (latest marathi news)

Fraud Crime
Nashik Cyber Fraud : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; सायबर भामट्याकडून डॉक्टरला दीड कोटीचा गंडा

त्यानंतर गाड्या भंगार भरण्यास कंपनीच्या गेटवर गेल्या असता तेथील कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. यावेळी आम्ही मॅनेजरला अ‍ॅडव्हान्स दिला आहे. परंतु, येथील गोदावरी पेपर मिलचे मॅनेजर यांनी सिद्दीकी यांना सांगितले की आमच्याकडे आपण कुठल्याही प्रकारचे पैसे जमा केलेले नाही. तोपर्यंत तोतया मॅनेजरने अज्ञात व्यक्तीसमवेत २५ लाख रूपये घेऊन फरारी झाल्याचे सिद्दीकी यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

आधी केली रेकी!

गोदावरी पेपर मिलमध्ये नेहमी भंगार साहित्य विकले जाते. त्यासाठी नेहमीच खरेदी करणारे येतात. कंपनीतील भंगार साहित्याची पाहणी करुन जातात. त्यामुळे शंका येण्याचे कारण नव्हते. सदर हे दोघे तीन दिवसांपासून येथे येऊन पाहणी करून गेले होते. तसेच सिद्दीकी यांना संपर्क साधून अगोदर बोलणे केले. भंगार साहित्याचे फोटो दाखवून आपण कंपनीचे मॅनेजर असल्याचे भासवून व्यवहाराचे बोलणे करण्यात आले होते. त्यानुसार मिलमध्ये बोलवून हातोहात फसवणूक केली.

Fraud Crime
Fraud Crime: तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.