Nashik Fraud Crime : सफरचंद व्यापाऱ्याला 38 लाखांचा गंडा!

Nashik News : बाजार समितीतील सफरचंद खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास दोघा संशयितांनी तब्बल ३८ लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : येथील बाजार समितीतील सफरचंद खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास दोघा संशयितांनी तब्बल ३८ लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रारंभी काही रकमेची परतफेड करीत भामट्यांनी उर्वरित रक्कम देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने पंचवटी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. (Fraud Crime 38 lakhs to an apple trader)

शाहिद इनामदार, अझीझ इनामदार (रा. दोघे सह्याद्री हॉस्पिटलसमोर मिरजकर नगर, वडाळारोड) अशी संशयितांची नावे आहेत. विशाल विनायक डोईजड (रा. गजपंथ, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा फळ खरेदी-विक्रीचा आयात, निर्यातीचा व्यवसाय आहे.

पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केटमधील गाळा नं. ६ येथे त्यांचे कार्यालय आहे. १२ ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या दरम्यान त्यांनी लिझीझी कंपनीच्या माध्यमातून आलेल्या सिमला अ‍ॅपलचा संशयितांना वेळोवेळी पुरवठा केला होता. (latest marathi news)

Nashik Fraud Crime
Dhule Crime News : गोट फार्म मालकांना 33 लाखांचा गंडा! सुमारे 780 बोकडांसह परप्रांतीय व्यापारी फरार

प्रारंभी संशयितांनी चोख व्यवहार केला. पाच महिन्यांच्या कालावधीत संशयितांना ७३ लाख १६ हजार १९८ रुपये किमतीचे सफरचंदचा पुरवठा करण्यात आला. यापोटी संशयितांनी ३५ लाख ५० हजाराची परतफेड केली.

मात्र उर्वरित ३७ लाख ६६ हजार १९८ रुपये देण्यास टाळाटाळ केली. सहा महिने उलटूनही संशयितांनी उधारीची परतफेड न केल्याने व्यापारी श्री. डोईजड यांनी पंचवटी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik Fraud Crime
Crime News : चोरट्यांनी लांबविला साडेचार लाखांचा ऐवज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.