Nashik Fraud Crime : फेक ॲपवरून पेमेंट झाल्याचे दाखवून फसवणूक!

Nashik News : सातपूर येथील एका पेट्रोलपंपावर आलिशान वाहनातून आलेल्या चालक व सोबतच्या महिलेने गाडीची टाकी भरून साडेचार हजार रुपयांचे डिझेलचे पेमेंट फेक ॲपवरून सक्सेसफुल झाल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार
Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : सातपूर येथील एका पेट्रोलपंपावर आलिशान वाहनातून आलेल्या चालक व सोबतच्या महिलेने गाडीची टाकी भरून साडेचार हजार रुपयांचे डिझेलचे पेमेंट फेक ॲपवरून सक्सेसफुल झाल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरीच्या अलीकडे असलेल्या रोहित पेट्रोलियम सर्विसेस पेट्रोलपंपावर बुधवारी (ता. २४) रात्री अकराच्या सुमारास. (Crime by pretending to pay from fake app)

निळ्या रंगाच्या चारचाकीतील चालकाने गाडीची टाकी फुल्ल करण्यास सांगितले. पेट्रोलपंपावरील कामगार पंकज बैरागी याने साडेचार हजार रुपयांचे डिझेल भरले. दरम्यान वाहनातूनच ऑनलाइन पेमेंट करीत असल्याचे भासविले. वाहनचालकासोबत असलेल्या महिलेने पंपाच्या स्कॅन कोड चार- पाच वेळा घेऊन, त्या दरम्यान फेक पेमेंट ॲपवरून पेमेंट सक्सेसफुल झाल्याचे दाखविले.

हे वाहन पंपावरून पपया नर्सरीच्या दिशेने निघून गेले. दरम्यान दुसरे वाहन आल्याने पंपावरील कामगार पंकज बैरागी डिझेल भरण्यास तिकडे गेला. या वेळी तो ४५०० हजारांचे पेमेंट आल्याचेही त्याने चेक केले, मात्र पेमेंट आले नसल्याने त्याने मालकाला त्यांच्याकडेही पेमेंट आल्याबाबत चौकशी केली. त्यांच्याकडेही पेमेंट आलेले नव्हते. (latest marathi news)

Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crime : निवृत्त ब्रिगेडियर महिलेचे सव्वा कोटी लांबविले; चोरलेले धनादेश वापरून घातला गंडा

फसवणूक झाल्याचा संशय आल्याने बैरागी याने पंपावरील सीसीटव्ही फुटेजवरून त्या गाडीचा नंबर घेवुन सातपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलिस पथक रोहित पेट्रोलपंपावर आले असता त्यांनी, त्या वाहन क्रमांकावरून वाहन मालकाचा शोध घेऊन संपर्क केला.

डिझेल भरल्याचे पैसे पेड केले आहे चेक करा, असे उत्तर सातपूर पोलिसांच्या गस्त पथकाला दिले. त्यानंतरही पंकज बैरागी या कामगाराने संबंधिताला अनेक वेळा फोन करून पैसे मागितले. अखेर बैरागी याने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सातपूर पोलिस करीत आहेत.

Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crime : खोटे दस्तावेज, खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची आर्थिक फसवणूक; आरोग्य सेवकावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.