Nashik Fraud Crime : बतावणी करून वयोवृद्धाची रोकड लांबवली; नाशिकरोडच्या सुभाष रोडवरील घटना

Nashik News : ८२ वर्षीय वयोवृद्धाला त्यांच्या स्कुटरजवळ पैसे पडल्याची बतावणी करीत स्कुटरमधील ४९ हजार रुपये ठेवलेली पिशवीच लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik News : नाशिकरोड परिसरातील सुभाषरोडवरील ड्राय फ्रुटूस्‌ खरेदीसाठी गेलेल्या ८२ वर्षीय वयोवृद्धाला त्यांच्या स्कुटरजवळ पैसे पडल्याची बतावणी करीत स्कुटरमधील ४९ हजार रुपये ठेवलेली पिशवीच लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime Extortion of cash from an elderly person)

भगवान हिंदूराव पाटील (८२, रा. शिवतिर्थ बंगला, करंजकर नगर, दसकगाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी (ता. ७) दुपारी एक वाजेच्या सुमारास सुभाष रोड परिसरातील रिपोटे कॉर्नरजवळील सागर ड्रायफ्रुटस्‌च्या दुकानात ड्रायफ्रुटस्‌ खरेदी करण्यासाठी केले होते.

त्यावेळी अज्ञात ३० ते ४० वयोगटातील संशयिताने वयोवृद्ध पाटील यांच्या स्कुटरजवळ पैसे पडल्याची बतावणी करीत, तुमची पैशांची पिवशी चोरीला गेली असे सांगितले.

Fraud Crime
Navi Mumbai Crime: परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, 23 जणांकडून उकळले...!

त्यावेळी पाटील यांनी स्कुटरची डिक्की उघडली असता, त्यावेळी संशयिताने पाटील यांचे लक्ष विचलित केले आणि स्कुटरच्या डिक्कीतून रोकड असलेली पिशवी हातचलाखीने लंपास केली.

पिशवीत ४९ हजारांची रोकड व बँकेची कागतपत्रे, एटीएम कार्ड होते. याप्रकरणी नाशिकारोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक बिडकर हे तपास करीत आहेत.

Fraud Crime
Nashik Crime News : वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिने चोरीला; इंदिरानगरमधील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.