Nashik Fraud Crime : निवाणेतील निधीचा घोटाळा; माजी उपसरपंचास अटक

Nashik Fraud Crime :कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायतीमधील निधी घोटाळा प्रकरणी अजून दोन जणांना पोलिसांनी अटक केली.
crime
crime esakal
Updated on

Nashik Fraud Crime : कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायतीमधील निधी घोटाळा प्रकरणी अजून दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यात माजी उपसरपंच व पॅनलप्रमुख संदीप ऊर्फ महेश पाटील यांचा समावेश आहे. यापूर्वी तत्कालीन ग्रामसेवक, माजी सरपंचासह पेसाचे माजी अध्यक्ष या तिघांना अटक झाली होती. आता त्यांना जामीन मिळाला असून, या प्रकरणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. (Former deputy sarpanch arrested in Niwana fund scam )

२०१६ ते २०२१ यादरम्यान कळवण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या निवाणे ग्रामपंचायतीमधील पेसाअंतर्गत व शासकीय योजनेतील निधीचा लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निवाणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर बागूल (रा. अभोणा), सरपंच बेबीबाई सोनवणे (रा. निवाणे), तसेच पेसा अध्यक्षा यशोदाबाई माळी (रा. निवाणे) या तिघांविरोधात १४ ऑगस्ट २०२३ ला कळवण पोलिस ठाण्यात ३० लाख ४९ हजार ८९४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कळवण पंचायत समितीतील विस्तार अधिकारी युवराज सोनवणे यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल झाली होती.

आरोपी सरपंच पेसा सदस्य असताना मूल्यांकने व ठराव ग्रामपंचायत निवाणे येथे दप्तरी मिळून आले नव्हते. आरोपी ग्रामसेवकाने २०१७ ते २०१८ या कालावधीत ग्रामनिधी व ग्रामीण पाणीपुरवठा निधीच्या कराच्या रकमा वसूल करून जमाच केल्या नव्हत्या. त्यामुळे ही रक्कम कोठे खर्च करण्यात आली, याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. तसेच २०१७ ते २०२१ पर्यंतचे रेकॉर्ड निवाणे येथे उपलब्धच झालेले नाहीत.

त्यामुळे ग्रामपंचायतीमधील एकूण रकमेचा आरोपींनी अपहार केल्याप्रकरणी ६ जुलैला तिघा संशयितांना कळवण पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यानंतर संबंधित संशयितांनी आमचा अशिक्षितपणाचा फायदा घेण्यात आला तसेच मोठ्या प्रमाणात रक्कम ही महेश पाटील यांच्या अकाउंटवर वर्ग झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी शुक्रवारी (ता. १२) त्याला अटक केली.

crime
Nashik Crime News : येवल्यातील त्या युवकावर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल!

आणखी काही जण यामध्ये असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलिस करीत आहे. या प्रकरणी आणखी काही भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेते हाताला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वर्षभरापूर्वी प्रकरण उघडकीस

आदिवासी गावात पेसा योजनेंतर्गत विकासासाठी प्राधान्याने निधी दिला जातो. मात्र या निधीचा प्रत्यक्ष विकासासाठी उपयोग न होता निधी अपहार झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. निवाणे गावामध्ये २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप ऊर्फ महेश पाटील याच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आले होते.

यातील सरपंच आणि पदाधिकारी आदिवासी व अल्पशिक्षित आहेत. त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन निधीत घोटाळा घडल्याचे बोलले जाते. येथे विकासकामे न करता पैशांचा अपहार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येऊन वर्ष झाले तरी फक्त एफआयआर नोंदवली गेली होती. मात्र संबंधितांना अटक झाली नव्हती.

crime
Nashik Crime News : सोयगाव परिसरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकुळ; मोबाईल वापरावा की नाही, मालेगावकरांना प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.