Nashik Fraud Crime : संशयित राठींच्या बँक व्यवहारांचा तपास सुरू; 28 कोटींचे फसवणूक प्रकरण

Fraud Crime : गंगापूर रोड परिसरातील राठी आमराई येथील जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाला तब्बल २८ कोटींना गंडा प्रकरणात मुख्य संशयित विजय जगन्नाथ राठी (७२) यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : गंगापूर रोड परिसरातील राठी आमराई येथील जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाला तब्बल २८ कोटींना गंडा प्रकरणात मुख्य संशयित विजय जगन्नाथ राठी (७२) यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे. (Nashik Fraud Crime Investigation into bank transactions of suspect Rathi )

दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी संशयित राठी कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली असून त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागविली आहे. याप्रकरणी विजय जगन्नाथ राठी, कौशल्याबाई जगन्नाथ राठी, सुजाता सतीश मंत्री, अर्चना श्रीकुमार मालाणी, श्रुती सुशांत लढ्ढा, आदिती प्रणय अग्रवाल, दीपक जगन्नाथ राठी, वृंदा अरविंद राठी, सुषमा बाळकृष्णा काबरा यांच्याविरोधात २८ कोटी १० लाख १२ हजार ४७५ रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयित विजय राठी यांना अटक केली होती. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासात संशयित राठी कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती संकलित करणे सुरू केले आहे.

crime
Nashik Fraud Crime : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह रफूचक्कर झाली! हिरावाडीतील एकाला घातला गंडा

तसेच संशयितांच्या बँक खात्याची माहितीही घेतली जात आहे. व्यवहार काही वर्षांपूर्वीचा असल्याने त्या काळातील बँक व्यवहाराची माहिती पोलिसांनी बँकांकडे मागितली आहे. त्याचप्रमाणे पसार संशयितांचाही शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे यांनी सांगितले.

आणखी एक अर्ज

शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे संशयित विजय राठींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच, बांधकाम व्यावसायिक वामनराव पुंडलिकराव लोखंडे यांचीही फसवणूक झाली आहे. लोखंडे यांनी ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल अर्ज आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे. संशयित विजय राठी, अरविंद राठी, दीपक राठी यांनी फसवणूक केल्याचे अर्जात म्हटले आहे.

crime
Nashik Fraud Crime : बांधकाम व्यावसायिकाला 28 कोटींचा गंडा; जागा मालकाने संगनमताने केली फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()