Nashik Fraud Crime News : बनावट पुस्तक छापून नव्वद लाखांचा अपहार! नाशिक बाजार समितीकडून फसवणुकीची तक्रार दाखल

Crime News : शुल्क वसुलीच्या जवळपास नव्वद लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बाजार समितीच्या बडतर्फ कर्मचाऱ्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Money Crime
Money Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime News : बनावट पुस्तक छापून नाशिक बाजार समितीची फसवणूक करून शुल्क वसुलीच्या जवळपास नव्वद लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बाजार समितीच्या बडतर्फ कर्मचाऱ्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक पडोळकर तपास करीत आहेत. (Nashik Fraud Crime Ninety lakhs embezzled by printing fake book news)

संशयित सुनील जाधव नावाची व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कार) या पदावर कार्यरत होता. १ डिसेंबर ते २४ मे २०२२ पर्यंत संशयित सुनील जाधव याची जकात नाका मार्केट शुल्क वसुलीकरिता नेमणूक करण्यात आली होती. या बाजार शुल्क वसुलीच्या काही रकमेचा भरणा त्याने बाजार समितीत केला होता.

पावती पुस्तक क्रमांक ७५, ८७, ३०१, ३२३, ३६५, ३६६, ३८९, ४३५, ४४२, ४६९, ५२९ या पावतीची पुस्तक संशयित जाधव यांना देण्यात आले होते. मात्र, संशयित जाधव याने बाजार शुल्क वसुलीसाठी दिलेल्या या पावती पुस्तकाचा वापर केला नाही. परंतु याच क्रमांकांचे बनावट पावती पुस्तक बनवून बाजार शुल्क वसुली केली. बाजार समितीने दिलेले पावती पुस्तक कार्यालयात जमा करीत पावत्याच फाडल्या नाहीत, असे सांगितले.

तसेच पावती पुस्तक क्रमांक ३०९ सुनील विश्वनाथ जाधव याला दिले नसताना त्या माध्यमातून बाजार शुल्कची वसुली केली. बाजार समितीच्या एकूण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून कृषी बाजार समितीच्या दप्तरात फेरफार करून त्याद्वारे एकूण रक्कम ८९ लाख ७७ हजार दोनशे रुपयांचा अपहार करून फसवणूक करून विश्वासघात केला.

प्रथमतः अपहार केल्याचे लक्षात येताच संशयित सुनील जाधव यांना बाजार समित्यांच्या सेवेतून निलंबित केले. अॅड. पी. व्ही. लोखंडे यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी करण्यात आली. या चौकशीत संशयित जाधव दोषी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशयित जाधव यांना बाजार समितीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले.  (latest marathi news)

Money Crime
Nashik Rathi Amrai Fraud Case : कोट्यवधींच्या फसवणुकीत 8 संशयिताचे ‘अटकपूर्व’ फेटाळले! वृद्धेला जामीन मंजूर

बाजार समितीने यावर त्रिसदस्सीय चौकशी समिती नेमली, सुमारे ८९ लाख आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीने संशयिताने सात दिवसांच्या आत अपहार केलेली रक्कम भरावी; अन्यथा फौजदारी कारवाई सामोरे जावे लागेल, असे पत्र पाठविले.

मात्र, संशयित जाधव याने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. जवळपास दोन ते तीन महिने हे प्रकरण औद्योगिक न्यायालयात चालले. मात्र निकाल हा संशयीताविरुद्ध लागला. या विरोधात संशयित जाधव याने उच्च न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने संशयित यांची बाजू ऐकून घेत ही बाब फौजदारी असल्याचे नमूद केले.

संशयिताने या प्रकरणी औद्योगिक न्यायालयात यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार औद्योगिक न्यायालयाचा निकाल बाजार समितीच्या बाजूने कायम राहिल्याने संशयित जाधव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून फसवणुकीचा व अपहारचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Money Crime
Nashik Fraud Crime News : बनावट नंबरप्लेट वापरून पिकअपचा वापर; संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.