Nashik Fraud Crime : गुंतवणुकीच्या आमिषाने 25 लाखांची फसवणूक! मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik News : फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूक करा, बँकेपेक्षा जास्त पैसे मिळतील, असे सांगून शहरातील डॉक्टरची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Fraud Crime
Nashik Fraud Crimeesakal
Updated on

मनमाड : फायनान्स कंपनीमध्ये गुंतवणूक करा, बँकेपेक्षा जास्त पैसे मिळतील, असे सांगून शहरातील डॉक्टरची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. शशिकांत पंडित कातकडे (वय ३८, रा. माधवनगर, मनमाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. (Fraud Crime of 25 lakhs with lure of investment)

की अविनाश ऊर्फ लखन दिलीप छाजेड, विशाल ऊर्फ पल्लू दिलीप छाजेड, शोभा दिलीप छाजेड आणि दिलीप पूनमचंद छाजेड (रा. मनमाड) यांनी विश्‍वास संपादन करून आम्ही विशाल फायनान्स एजन्सीत आहे. गुंतवणूक करा, रकमेवर जादा व्याज मिळेल.

असे सांगितल्याने २०२० मध्ये महाराष्ट्र बँकेच्या धनादेशाद्वारे तीन लाख रुपये शोभा दिलीप छाजेड, स्टेट बँकेच्या धनादेशाद्वारे एक लाख रुपये शोभा दिलीप छाजेड, द नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या धनादेशाद्वारे ५० हजार शोभा दिलीप छाजेड यांना दिले. (latest marathi news)

Nashik Fraud Crime
Nashik Crime News: अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळल्या! गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी; 21 तोळे सोने जप्त

याच नावाने चार लाख ५७ हजार रुपये धनादेशाने दिले. २० लाख ५० हजार रुपयांची रोकड दिली. एकूण २५ लाख रुपयांची गुंतवणूक विशाल फायनान्समध्ये केली. गुंतवणुकीबाबत वेळोवेळी विचारपूस केल्यानंतर २३ लाखांचा धनादेश दिला.

मात्र, बँकेमध्ये वटला नाही. वरील व्यक्तींना चेक बाउन्स झाल्याचे सांगितल्यानंतर कोर्टात केस टाकली, तर पाहून घेऊ, अशी दमबाजी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अशोक घुगे तपास करीत आहे.

Nashik Fraud Crime
Nashik Crime News : देवळा घरफोडीतील संशयिताला अटक! 3 दिवसांची कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.