Nashik News : परदेशात कांदा निर्यात करून दोघा संशयितांनी कांदा व्यापाऱ्यास १५ लाखांना तर, परदेशात द्राक्ष कंटेनरची यूएस डॉलरमध्ये विक्री करून द्राक्ष व्यापाऱ्यास २१ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परदेशात कांदा निर्यात करण्यासाठी खरेदी करून संशयितांनी एका व्यापाऱ्याला १५ लाख ३४ हजारांचा गंडा घातला आहे. (Nashik Fraud Crime)
नितीन जिवारक, युगंधर पालोदकर असे संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. तर, कांदा व्यापारी अजय ओंकार मिश्रा (रा. नंदिनी बंगला, गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये संशयितांच्या मार्फत मलेशिया येथे कांदा निर्यात करण्यासंदर्भात ठरले होते. त्यानुसार, मिश्रा यांनी स्वखर्चाने कांदा खरेदी करून प्रतवारीनुसार त्याची बांधणी केली आणि संशयितांच्या समुदेरा शिपींग लाईन लि. मार्फत १७ लाख ३४ हजार रुपयांचा ६० टन कांदा निर्यात केला.
त्या वेळी संशयित युगंधर याने मिश्रा यांच्या एसएम ट्रेडलिंकच्या खात्यावर दोन लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर उर्वरित पैशांची मागणी केली असता, संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. मात्र अद्यापही संशयितांनी उर्वरित १५ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम दिलेली नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्ष विक्री करून संशयितांनी एकाला तब्बल २१ लाख ९६ हजारांना गंडा घातला आहे. गंगाराम सुखदेवराम चव्हाण (रा. भांडूप, मुंबई), बापू निंबोरे (रा. श्रीगोंदा, नगर), नितीन रमेश तानीर (रा. बोरिवली, मुंबई) असे संशयितांची नावे आहेत. योगेश रमण गोऱ्हे (रा. श्रीराम कॉलनी, राजसारथी सोसायटी मागे, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार. (latest marathi news)
गेल्या एप्रिल २०२३ मध्ये संशयितांनी गोऱ्हे यांचा विश्वास संपादन करून त्यांचे द्राक्षाचे चार कंटेनर दुबई येथे पाठविले होते. त्यानुसार गोऱ्हे यांचा सर्व माल आंतरराष्ट्रीय बाजारात ५४ हजार ८६२ यूएस डॉलरमध्ये विक्री करण्यात आला होता. संशयित मिडवाला स्टार फ्रूट स्टाफ ट्रेडिंग कंपनीचा मालक गंगाराम चव्हाण याने व्रिकी केलेल्या मालाचे पैस आठ दिवसात देतो असे सांगून दोन कंटेनर मालाचे १८ हजार ६२५ यूएस डॉलर गोऱ्हे यांच्या बँक अकाउंटला पाठविले.
तर उर्वरित २ हजार ७५९ यूएस डॉलर अर्थात २१ लाख ९६ हजार ५०६ रुपये परत करण्यास टाळाटाळ केली आहे. अद्यापही सदरची रक्कम देण्यात आलेली नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल कला असून, उपनिरीक्षक शिरसाट हे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.